सागर जगदाळे
भिगवण : कॉलेजला जाण्यासाठी बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणीला भादलवाडी (ता. इंदापूर) येथील गावातील मुलाने दमदाटी करून निर्जनस्थळी नेहून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी एका तरुणावर भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धिरज बापु भंडलकर (वय-२३ रा. भादलवाडी, ता. इंदापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ३०) सकाळी पाऊणेसात वाजण्याच्या सुमारास सदर मुलगी पळसदेव येथील एल. जी. बनसुडे स्कुल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज येथे कॉलेजमध्ये जान्यासाठी भादलवाडी येथील बसस्टॉपवर बसची वाट पाहत थांबली होती. यावेळी त्याच गावातील संशयित आरोपी धिरज भंडलकर हा त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीवरून त्या ठिकाणी आला व तु एकटी इथे काय करते ? का उभा राहीली आहे ? असे म्हणुन दमदाटी करून गाडीवर बसण्यास भाग पाडले.
तसेच शाळेसाठी पळसदेव येथे न सोडता गाड़ी पुणे सोलापुर हायवे रोडने भिगवण, पाटस मार्गे कुरकुंभ येथुन यवत येथे डोंगरवार घेवुन जावुन तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व त्यानंतर याबाबत कोणास काही सांगीतले तर मी तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.