दिनेश सोनवणे
दौंड : नायगाव (ता. दौंड) येथील उजनी संपादित क्षेत्रातून १०५ ब्रास मातीची चोरी करणाऱ्या तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर महसूल विभागाने ३ लाख १५ हजार रुपयांची दांडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे माती चोरांचे ढाबे दणाणले आहे.
मिलिंद शिवाजी मोरे, मुकेश शिवाजी मोरे आणि जेसीपी मालक सागर विलास जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मलठणचे तलाठी नंदकुमार खरात यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगाव (ता. दौंड) येथील गट नं दहा उजनी संपादित क्षेत्रातून मातीची चोरी होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने महसूल विभागाचे पथक सदर ठिकाणी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, वरील आरोपी उजनी संपादित क्षेत्रातून मातीची चोरी करीत असल्याचे आढळून आले आहे.
याप्रकरणी मलठणचे तलाठी नंदकुमार खरात यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मिलिंद शिवाजी मोरे, मुकेश शिवाजी मोरे, जेसीपी मालक सागर विलास जाधव यांच्यावर खाण व खनिज अधिनियम पर्यावरण अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच महसूल विभागाने १०५ ब्रास मातीची चोरी केल्याप्रकरणी ३ लाख १५ हजार रुपयांची दांडात्मक कारवाई केली आहे.
दरम्यान, हि कारवाई मंडळ अधिकारी मंगेश नेवसे, तलाठी नंदकुमार खरात, कोतवाल रोहिदास कांबळे आणि पोलीस पाटील प्रभाकर पालेकर यांच्या पथकाने केली आहे.