Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर बांधकाम साहित्याची (construction materials) वाहतूक करणाऱ्या काही डंपरला ( dumpers transporting) नंबरप्लेट नसून महामार्गावर रेडिमिक्स गाड्या, वाळू, माती, मुरूम, कचऱ्याचे डंपर, ट्रॅक्टर (transport ready-mix trucks, sand, soil, mud, waste dumpers, tractors on the highway) या वाहनांमध्ये जणू भरधाव वेगाने नेण्याची स्पर्धाच पहायला मिळत आहे. वाहनांचा वेग, ओव्हरलोड तपासून दंडाचा अधिकार ‘आरटीओ’ विभागाचा आहे. मात्र आरटीओ विभागही ‘अर्थपूर्ण’ रित्या बघ्याची भूमिका ( RTO department has the authority) घेत असल्याचे दिसून येत आहे. (Loni Kalbhor News)
पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांवर कारवाई..
पुणे -सोलापूर महामार्गावर तरडे, कोरेगाव मूळ, शिंदवणे, व वळती, वाघोली, लोणीकंद परिसरातून पुणे – सोलापूर महामार्गावर क्षमतेपेक्षा जास्त माल डंपरमध्ये भरलेला असतो. त्यातच चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांसमोर वाहन क्रमांक न दिसणारे डंपर राजरोसपणे ये-जा करताना दिसून येत आहेत. मात्र वाहतूक शाखेचे पोलीस मात्र सोलापूरच्या बाजूकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना दिसून येत आहेत.
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, थेऊरसह परिसरात अनेक मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी जड वाहनाबाबत पाळावयाचे सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात आलेले आहेत. या बांधकाम प्रकल्प मधून बांधकाम साहित्य घेऊन ये जा करणाऱ्या डंपरची चाके मातीने माखलेले असतात. ती माती रस्त्यावर पसरते. आरटीओ कडक कारवाई करू शकते. मात्र हे मोठे डंपर धनदांडग्यांचे असल्यामुळे कारवाई टळते. त्याच वेळेस सामान्य माणसावर मात्र कारवाई होत असल्याचे आरोप नागरिक करू लागले आहेत.
धुळीचा नागरिकांना त्रास..
खाणपटटा असलेल्या वाघोली, लोणीकंद, भावडी या परिसरातून खडी, वाळू व डस्टची मागणी वाढली आहे. त्यामुळे डंपरची वाहतूकही बेसुमार वाढली आहे. यातील बहुतांश जड वाहने कोणत्याही आच्छादनाविना भरधाव वेगात पुणे – सोलापूर महामार्गावर सुसाट चालत आहेत. त्यामुळे उडणाऱ्या त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दरम्यान, धुळीमुळे आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. पूर्व हवेलीतील काही गावातील रस्ते अगोदरच अरुंद असल्याने वाहतूक कोंडीही होत आहे. बेशिस्त डंपर चालकांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.
आरटीओ विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप…
पुणे-सोलापूर महामार्गावर डंपर, रेडिमिक्स गाड्या, मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यामधून सरासपणे क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होताना दिसून येते. मात्र, या वाहतुकीकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करीत आहेत. तसेच महामार्गावरील अवजड वाहतूक, वाढत्या अपघातांबाबत पुणे प्रादेशिक परिवहन विभाग गंभीर नसल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.
महसूल अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट
पूर्व हवेलीतील पुणे -सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या वाळूच्या वाहनांचा वेग, चालकांची तपासणीचे अधिकार महसूल विभागाला आहेत. मात्र महसूल अधिकाऱ्यांनी कधी वाहनांच्या वेगाची तपासणी केल्याचा अहवाल नाही. की कधी वाहनचालकांनी मद्यपान केले आहे किंवा नाही यावर कारवाईही केलेली नाही. यामुळे या सर्वांचेच तोंडावर बोट आहे.