पुणे : राज्यासह देशात लाखो नागरिकांना फ्रॉड लोन अॅपच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या टोळीला पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र आणि बेंगोलरमधून १८ आरोपीना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले स्वप्निल नागटिळक, श्रीकृष्ण गायकवाड, धीरज पुणेकर, प्रमोद रणसिंग, मुमताज कुमठे, सॅम्युअल कंदीयल पिता इब्राहिम, मोहम्मद मनियत पिता मोहिदू यांना महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ११ आरोपींना बेंगलोरहुन अटक करण्यात आली असून बेंगोलरमध्ये असलेले कॉल सेंटर उध्वस्त केले आहे. लाखो नागरिकांची फसवणूक झाली असून याचा थेट संबंध हे विदेशी लोकांपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी हे फ्रॉड लोन अॅपच्या माध्यमातून कॉल सेंटरचे काम करतात. हे लोन अॅप कर्ज घेतलेल्या लोकांना कॉल करून अश्लील भाषा वापरून, शिवीगाळ करून तसेच धमकी देण्याचे मेसेज कॉल करण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे लोन ॲप कंपनी मार्फत लोनचे कर्ज घेतलेल्या हजारो लोकांचे खाजगी डेटा व त्यांच्याकडील जप्त डिजिटल डिव्हायसेस व कागदपत्रांमध्ये मिळून आला. सदर कॉल सेंटर १६ पेक्षा जास्त लोन एप्लीकेशन कामकाज चालत असल्याचं पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रातून ज्या आरोपीना अटक करण्यात आली त्याच्याकडून पोलिसांनी मोबाइल हँडसेंट सिमकार्ड एकूण ४८, बँक खाते ५६, संगणक व लॅपटॉप चेकबूक पासबुक २७, इतर कंपनी सिम ३०, डेबिट कार्ड १६७, पेटीएम मशीन १, पॅनकार्ड १५, आधारकार्ड ११, मतदार कार्ड ४, शिक्के ४ असा मुद्देमाल तर बेंगोलरहुन जे आरोपी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दहा सिमकार्ड, हजेरी रजिस्टर, ओळखपत्र, लेटरहेड, नोंदवही, डीव्हीडी, पंधरा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्टर, स्विच मशीन, तीन इंटरनेट राऊटर, पीडितांचे मोबाईल क्रमांकाचे चार्ट, ५० इन्व्हाईस फाइल्स, दहा मोबाईल, फोन हेडफोन असा सायबर पोलिसांनी ७० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.