पुणे : गॅस सिलिंडरची वाहतूक करणार्या पिकअप वाहनाने एका दुचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. कुरकुंभ हद्दीतील सेवा रस्त्यावर हा अपघातात झाला असून दुचाकीचालक ठार तर मागे बसलेला एकजण जखमी झाला आहे. अपघातानंतर पिकअपचालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला.
हा प्रकार बुधवारी (ता.२८) रोजी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास घडला. संतोष वामन खाडे (वय १९) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव योगेश वारके असे जखमीचे नाव आहे.
खाडे हा कंपनीतून घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत वामन यशवंत खाडे (वय ५२, रा. शेवाळे प्लांट, कुरकुंभ, ता. दौंड, मूळ रा. रासळ, पोपाली, ता. सुधागड, जि. रायगड) यांनी कुरकुंभ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पिकअप चालकाविरुध्द दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यादरम्यान मळदकडे भरधाव वेगात जाणार्या पिकअपने (आर जे ४३ जी ए ३८८३) दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात संतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला गौरव वारके याच्या उजव्या पायाला मार लागला आहे. या घटनेनंतर पिकअपचा चालक फरार झाला आहे. तपास कुरकुंभचे पोलिस हवालदार शंकर वाघमारे करीत आहेत.