दौंड : कुरकुंभ – बारामती रस्त्यावरील जिरेगाव (ता. दौंड) येथील अनोळखी इसमाचा ओळख पटवून खुनाचे गूढ उलघाडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. हा खून दारू पिताना झालेल्या वादातूनच ३ मित्रांनी केला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांनाही ही अटक केली आहे,
प्रफुल्ल उर्फ मोनू राजेंद्र बारावकर (वय २६ वर्षे रा खंडोबा नगर बारामती, बारामती जि पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तर किशोर उर्फ मोन्या सोमनाथ खंडाळे (वय २३, रा कुरकुंभ), शुभम उर्फ बाबा उद्धव कांबळे (वय २३ वर्षे रा कुरकुंभ) आणि गणुजी उर्फ आबा रमेश खंडाळे (वय २६ वर्षे रा कुरकुंभ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिरेगाव बारामती रस्त्यालगत एक २५ ते ३० वर्ष वय असलेले पुरुष जातीचे अनोळखी इसमाचे प्रेत खून करून टाकून देण्यात आल्याचे रविवारी (ता.२९) आढळून आले होते.
सदर मयत इसमाची अवघ्या थोडया वेळातच ओळख पटवून त्याचा खून का झाला असावा किंवा कोणी केला असावा हे शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नेमण्यात आले होते.
पोलीस तपास करीत असताना, पोलिसांना मयत इसम प्रफुल्ल उर्फ मोनू बारावकर याचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलिसांनी प्रफुल्लचे मित्र आणि नातेवाईक यांचेकडे माहिती घेतली असता, मयत प्रफुल्ल हा त्याच्या ३ मित्रांसोबत दारू पिण्यासाठी कुरकुंभ येथील एका हॉटेल मध्ये गेला होता. अशी माहिती समोर आली.
त्यानंतर पोलिसांनी वरील तीनही मित्रांना बोलावून अधिक चौकशी केली असता, वरील तिन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी वरील तिन्ही जणांना ताब्यात घेऊन खाक्या दाखविताच, वरील तिन्ही आरोपींनी सदर खुनाची कबुली दिली आहे.
दरम्यान, दारू पिऊन वाद झाल्यामुळे आरोपींनी प्रफुल्लला दौड कुरकुंभ रोड घाट येथे नेऊन जीवे मारले आणि त्याला उचलून कुरकुंभ बारामती रोडवर असणारे जिरेगाव येथे रस्त्याच्या कडेला टाकून दिला. असे आरोपींनी सांगितले आहे. वरील तिन्ही आरोपींना ३ पुढील तपासकामी दौड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.