यवत : पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील भीमा नदीपात्रात मागील काही दिवसात ७ जणांचे मृतदेह आढळून आले होते, या मृत्यूंचे गूढ उकलण्यात पोलिसाना यश मिळाले आहे. आपल्या मुलाने नात्यातील विवाहित मुलीला पळवून नेल्याने सातजणांनी आत्महत्या केली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मोहन उत्तम पवार (वय ४५) पत्नी संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव ता. गेवराई जि.बिड ), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४), जावई शाम पंडीत फुलवरे (वय २८), नातू रितेश उर्फ भैया शाम फलवरे (वय ०७), छोटु शाम फलवरे (वय ०५) व कुष्णा शाम फलवरे (वय ०३ सर्व रा. हातोला ता. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद) अशी एकूण ७ मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार यांना अमोल आणि राहुल अशी दोन मुले आहेत. अमोल हा पारगाव येथे राहतो तर राहुल हा पुण्यामध्ये असतो. अमोल याने मागील आठ दिवसापूर्वी त्याच्याच नात्यातील एका विवाहित मुलीला पळवून आणले होते. या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले. स्वाभिमानी पवार दाम्पत्याने मुलीला सोडून येण्यास सांगितले. यामुळे आपली बेअब्रू होत असून यामुळे विष पिण्याचा किंवा जीव देण्याचा इशारा दिला होता.
शेवटी मोहन पवार यांनी यांनी दुसरा मुलगा राहुल याला सर्व घटना सांगितली. आमोल परतला नाही तर आम्ही जीव देणार असल्याचे राहुलला निरक्षूं सांगितले. मात्र अमोल न परतल्याने पवार दाम्पत्याने सामूहिक आत्महत्येचा पर्याय निवडला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानुसार गोयल यांनी यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीमेसाठी तैनात केली. रविवारी सापडलेल्या मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवून वरील ७ जणांच्या आत्महत्येचे गूढ उलघडले आहे.
चिमुकल्याचा काय दोष ?
अमोल पुण्यात राहण्यास होता. त्याने विवाहित मुलीला पळवून नेले. यामुळे त्याचे आई वडील प्रचंड दुखावले होते. मुलगी, जावाई, तीन चिमुकल्याना घेऊन पवार दाम्पत्याने आत्महत्या केली. तीन चिमुकल्याचे विश्व् उलघडण्यास आता कुठे सुरुवात झाली होती. तिघे देखील ७ वर्षांच्या खालील वयाचे होते. अमोलने मुलगी पळवून नेली, यात त्या चिमुकल्यांचा काय दोष होता ? असा सवाल उत्पन्न झाला आहे.