पुणे : तुझे ज्यादा मस्ती चढी है. मै कुछ बाते भुला नही असे म्हणत एका तरुणाला सराईत गुन्हेगार व त्यांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. टोळक्याने दहशत माजवत हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येरवडा येथील टँक रोऊ स्टार गॅरेजसमोर ही घटना घडली आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतला आहे. आमन अमरदीप भानु (वय २३, रा. वाल्मीकी वस्ती, येरवडा), नितेश सदभैय्या व आकाश पवार (वय २७) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत अक्षय कदम (वय २७) यांनी तक्रार दिली आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय हे मित्रांना भेटून पायी चालत घरी निघाले होते. त्यावेळी टोळक्याने त्याला अडविले. आमन याने त्याला तुझे ज्यादा मस्ती चढी है. मै कुछ बाते भुला नही. असे म्हणून हातातील लोखंडी कड्याने मारहाण केली. तर इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाणकरून परिसरात दहशत माजविली. आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादी कोणी लागला तर तोडून फोडून टाकतो असे म्हणत गोंधळ घातला. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.