पुणे : शरीरसंबंधाचे आमिष दाखवून ५० वर्षीय नागरिकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून महाविद्यालयातील तीन तरुण व एका तरुणीने ९३ हजार रुपये लुटल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तीन तरुण आणि एका तरुणीला अटक केली आहे.
धीरज वीर (वय- १९ रा. प्रतीक नगर, येरवडा), जॉय किरण मंडळ (वय – १९ रा. श्रीनाथ नगर घोरपडी, पुणे), एक अल्पवयीन तरुण व कांचन उर्फ डिंगी (वय- १९ रा. टिंगरेनगर लेन नं- १४ ) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरसंबंध ठेवण्याच्या आमिषाने पैसे देऊन तीन ते चार वेळा फिर्यादीने आरोपी तरुणीसोबत शरीर संबंध ठेवले. शरीर संबंध ठेवत असताना आरोपीला लक्षात आले की फिर्यादीकडे अमाप पैसे आहे. म्हणून आरोपी तरुणीने शक्कल लढवत तीन मित्रांसोबत संगनमत करून फिर्यादीला लुटण्याचं ठरवलं.
शरीर संबंधसाठी फिर्यादीला डीवाय पाटील कॉलेज या ठिकाणी बोलवले फिर्यादी आपली चारचाकी कार घेऊन डीवाय पाटील कॉलेज येथे आला असता, तरुणी व तिच्या मित्रांनी फिर्यादीच्या गाडीवर ताबा घेतला. त्याच चारचाकीमध्ये बसून फिरत असताना फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ करत हा सगळा प्रकार तुझ्या पत्नीला सांगू अशी धमकीही देण्यात आली.
फिर्यादीला बंडगार्डन येथे एचडीएफसीच्या एटीएममध्ये आरोपी घेऊन गेले आणि २५ हजार रोख रक्कम काढून घेतली. यावरही आरोपी थांबले नसून फिर्यादीकडून वारंवार पैसे उकळत राहिले. असं करुन फिर्यादीकडून तब्बल ९३ हजार रुपये उकळण्यात आले. ही रक्कम घेतली असतानाही आरोपींनी ५ डिसेंबर रोजी अजून पैशांची मागणी केली.
दरम्यान, याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या अधिक तपासामध्ये एका १९ वर्ष महिला आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.