रीवा : मौगंज (जि रीवा, मध्य प्रदेश) येथे प्रेयसीला निर्दयीपणे लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या आरोपी प्रियकर पंकज त्रिपाठीला उत्तरप्रदेशातील मिर्जापुरमधून पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अटक केली आहे. तर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी प्रियकराच्या घरावर बुलडोझर चाडविला आहे. तर या प्रकरणात एक पोलीस निरीक्षक निलंबित करण्यात आला आहे.
ये आदमी जीवन भर जेल में रहेगा तभी इस तरह कि हैवानियत को कम किया जा सकेगा.
जानवर की तरह एक लड़की को पिटता हैवान है.
तालिबानी बर्बरता है ये- #सजा भी वैसी ही होनी चाहिए. #मध्यप्रदेश https://t.co/WPsodWbFPQ— Chitra Tripathi (@chitraaum) December 24, 2022
आरोपी पंकज त्रिपाठी याच्याविरोधात अपहरण, प्राणघातक हल्ला आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणाविरुद्ध आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज त्रिपाठी आणि प्रेयसी यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद होते. या वादाचे रुपांतर भांडणात होते. व प्रियकर रागाने प्रेयसीला जमिनीवर फेकतो. आणि तिच्या चेहऱ्यावर अनेक वार केले. यानंतर मुलगी बेशुद्ध पडते. चूक लक्षात आल्यानंतर तरुणाने त्याला उठवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही ती मुलगी शुद्धीवर आली नव्हती.
रीवा जिले के मऊगंज क्षेत्र में युवती के साथ हुई बर्बरता की घटना में अपराधी पंकज त्रिपाठी को गिरफ्तार कर उसके घर पर बुलडोजर चलाया गया। ड्राइवर पंकज का लाइसेंस भी कैंसल कर दिया गया है।
मध्यप्रदेश की धरती पर महिलाओं पर अत्याचार करने वाला कोई बख्शा नहीं जायेगा। pic.twitter.com/Z4gHr2lWsk
— Office of Shivraj (@OfficeofSSC) December 25, 2022
त्यानंतर मुलीचा मित्र आणि इतर लोक तेथे पोहोचतात. सर्वजण मुलीला शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्नात करतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला होता. पोलिसांनी व्हिडिओचा तपास सुरू कसून आरोपीचा शोध घेत होते.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला मिर्जापुर (उत्तर प्रदेश) मधून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. तर या घटनेत निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक श्वेता मौर्य यांना निलंबित करण्यात आले.
दरम्यान, बॉयफ्रेंडने प्रेयसीला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ पाहून लोकांमध्ये संताप पसरला होता. आणि संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रियकराच्या घरावर बुलडोझर चढवून आपला रोष व्यक्त केला आहे. यामध्ये प्रियकराचे घर उद्धवस्त करण्यात आले आहे.