Wednesday, May 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३१ वर्षांनी पुन्हा भरली शाळा…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 26 December 2022, 12:50

विशाल कदम

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल ३१ वर्षानंतर शाळा रविवारी (ता.२५) भरली होती.

 

विद्यालयात सन १९९९० -९१ ला दहावीच्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी एकमेकांसमोर आल्याने एकमेकांना ओळखू शकत नव्हते, परंतु, ओळखल्यानंतर डोळ्यातील निरागस मैत्री जशीच्या तशी समोर आली. आणि त्याच लाकडी बाकांवरती पुन्हा एकदा आपल्या आवडत्या सवंगड्या बरोबर बसण्याची हौस प्रत्येकाने भागवून घेतली असल्याचे दिसून येत होते. आनंद, आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना सवंगड्याच्या चेहऱ्यावर दिसत होत्या.

पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलतील दहावीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमध्ये २०१९ ला १५ ते २० मित्र एकत्र आले. कोरोना निर्बंध असल्याने पुढील दोन वर्षे गेट टुगेदर व्हॉट्सऍप ग्रुपवरच झाले. त्यानंतर काही मुली पण त्यामध्ये अॅड झाल्या. आणि आपल्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घ्यावा असे ठरविण्यात आले होते.

त्यानुसार पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवारी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. या स्नेह मेळाव्यात १५० हून अधिक माजी विद्याथ्यांनी उपस्थिती लावली.

यावेळी माजी शिक्षक पाटोळे, नाईक मॅडम, नाईक सर, सूर्यकांत नामुगडे, एस डी जाधव, झांबरे, आमटे, गुलदगड सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निधन झालेले माजी प्राचार्य राम सुळगेकर, प्रभा सुळगेकर, राकेश काळभोर यांच्यासह दहावीच्या माजी मित्रांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय करून दिला. शालेय जीवनातील काही गमतीदार आणि काही विनोदी आठवणींना उजाळा दिला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो. हे विसरून गेले होते.

दरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डायस व म्युझिक सिस्टीम भेट प्राचार्य सीताराम गवळी यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी कल्पना बोरकर, संजीवनी बोरकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या स्नेह मेळाव्याचे आयोजन सुनीता तिवारी, सचिन राठी, स्वाती सासवडकर, शिवदास काळभोर, राहुल काळभोर, अमोल दुगाने, गणेश कुंभार, गजानन मुळे व माजी विद्यार्थ्यांनी केले होता.

शाळेतील माजी विद्यार्थी आज राजकारण, शिक्षण, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी त्या क्षेत्रात कामाचा वेगळा ठसा उमटवत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर स्नेह भोजन व फोटोसेशन झाले. अनेकजण हे आनंदी क्षण आपल्या कॅमेर्‍यात टिपत होते. या आनंदयात्री सोहळ्यात सर्वच जण हरखून गेले होते. अशा पद्धतीने शाळेचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी बोलताना माजी विद्यार्थी व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चित्तरंजन गायकवाड म्हणाले, आज आपण विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत आहोत. त्याचे सर्व श्रेय जाते ते. आपल्याला चांगले शिक्षण देणारी शाळा व शिक्षकवृंद होय. आपण ज्या शाळेत शिकलो व चांगल्या प्रकारे घडलो. आपण तिला विसरून जाता कामा नये. आपण शाळेला आपापल्या पद्धतीने सर्वोतोपरी मदत केली पाहिजे. तसेच या स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो. तसेच पुढीलवर्षापासून नेहमी वार्षिक स्नेहमेळाव्याचे आजोजन करावे. अशी गायकवाड यांनी आयोजकांना विनंती केली.
यावेळी बोलताना माजी विद्यार्थी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी सरपंच नंदू काळभोर म्हणाले कि, शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी एकत्र आल्याने खूप आनंद झाला आहे. एकमेकांना भेटल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या पुढील काळात सर्व मित्रांनी एकमेकांच्या सुख दुख:त राहिले पाहिजे. व आपल्या आलेल्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. मी सर्व मित्रांच्या सोबत असून, आलेल्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणार आहे.
यावेळी बोलताना माजी विद्यार्थिनी सुनिता तिवारी-मिश्रा म्हणाल्या कि, आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे ऋणी असतो. हे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. मात्र आपण शाळेला प्रेमरुपी व निस्वार्थीपणे मदत केली पाहिजे. व विद्यार्थी व शाळा यामध्ये कायम ऋणानुबंध राहिले पहिले. या संकल्पनेतून दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३१ वर्षानंतर स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह मेळाव्यामुळे सर्व मित्र मैत्रिणींची पुन्हा गाठीभेटी झाल्या. व यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांची आठवण म्हणून शाळेला एक छोटीशी भेटवस्तू देण्यात आली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post

संतप्त नागरिकांनी प्रियकराच्या घरावर चढविला बुलडोझर, आरोपी अटकेत तर पोलीस निरीक्षक निलंबित ; प्रेयसीला निर्दयीपणे लाथाबुक्यांनी बेदम मारहाण प्रकरण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.