पुणे : टॅटू गोंदवून घेणे उत्तर प्रदेशातल्या 14 जणांना महागात पडले आहे. ही घटना नुकतीच उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये घडली. 14 जणांना टॅटूसाठी एकच सुई वापरत मृत्यूच्या दाढे ढकललं आहे. या 14 जणांची विचारपूस केली असता, त्यांनी असुरक्षित संबंध ठेवला नव्हता. मात्र 14 जणांनी एकाच टॅटू आर्टिस्टकडून टॅटू गोंदवला होता. धक्कादायक म्हणजे या टॅटू आर्टिस्टने पैसे वाचविण्यासाठी एकच सुई वापरल्याचे समोर आले. या घटनेमुळे टॅटू गोंदवणं 14 जणांच्या चांगलच अंगलट आलं आहे.टॅटू काढण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता टॅटू काढताना केवळ एक दोनदा नव्हे तर दहा वेळा विचार करा
टॅटू काढा त्याआधी या नियमांचे पालन करा.
-टॅटू काढण्याऱ्या व्यक्तिकडे टॅटू काढण्याचं अधिकृत लायसन्स असले पाहिजे
-टॅटू काढण्याऱ्या व्यक्तिने स्वच्छ कपडे परिधान केलेले असावे.
-टॅटू काढण्याआधी कोणती डिझाईन काढयची याबाबत खात्री करून घ्या.
-टॅटू स्टिडीओमध्ये स्वच्छता आहे की नाही याची खात्री करून घ्या.
-टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी सुई नवीन आणि उत्तम दर्जाची असावी याची खात्री करून घ्या.
-टॅटू काढल्यानंतर टॅटू आर्टिस्टला तुमच्यासाठी वापरलेली सुई फेकून द्यायला सांगा.
-टॅटू गोंदवून घेतल्यानंतर कमीत कमी चार ते पाच तास तो टॅटू कापसाने कव्हर करा.
-टॅटू काढल्यानंतर उन्हात जाऊ नका.
-टॅटू काढल्यानंतर काही दिवस त्या जागेला इतर कोणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या.
टॅटू काढताना काळजी न घेतल्यास होऊ शकतात ‘हे’ 3 आजार
१)हेपेटाइटिस बी
२)व्हायरल इंफेक्शन
३)एच आय व्ही