पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे या ठिकाणी स्पार्कल कॅण्डलच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यात आग लागून जागीच सहा महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. पण आता मृतांचा आकडा आता वाढतच चालला आहे. गंभीर जखमी कामगारांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उषा पाडवी (वय-४०) यांचा आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास मृत्यू झाला.
आगीच्य घटनेत सुरूवातीला असलेला सहाचा आकडा दिवसेदिवस वाढतच चालला आङे. तळवडे आगीच्या घटनेतील मृतांचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे. घटनेमध्ये शिवराज एन्टरप्रायजेस कंपनीचा मालक गंभीर जखमी झाला होता. शरद सुतार असं त्याच नावा आहे. शरद सुतारला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल आहे. शरद सुतार हा शिवराज एन्टरप्रायजेस कंपनीचा मालक आहे. त्याच ठिकाणी स्पार्कल कँडल बनवल्या जात होत्या.
आत्तापर्यंत प्रतीक्षा तोरणे, कविता राठोड, शिल्पा राठोड, प्रियंका यादव, अपेक्षा तोरणे, कमल चौरे, सुमन गोधडे आणि आज उषा पाडवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे. दरम्यान, नातेवाईकांच्या विनंतीनंतर घटनेतील जखमी रेणुका ताथोड यांना ससून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला नातेवाईकांनी अमरावतीला नेले आहे.