पुणे : सख्ख्या काकाच्या विश्वास ठेऊन दोन अल्पवयीन मुली घरी ठेवून आईवडील बाहेरगावी गेले होते. त्याच काकाने व त्याच्या मित्राने गैरफायदा घेऊन दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भवानी पेठेत घटना घडली आहे. खडक पोलिसांनी दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.
इरफान आतिक (२९) आणि मोहम्मद धोबी (४०) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका समाजसेविकेने पोलिसात तक्रार दिली. सदर प्रकार गेल्या २० ते २२ दिवसांपासून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्या कुटुंबातील आई वडिल दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आरोपी काका हा त्यांच्याकडे रहायला आला. आरोपीने शनिवारी (ता.२१) दुपारी या दोन मुलींवर बलात्कार केला. त्यापूर्वी २० दिवस अगोदर आरोपीने १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. तर आरोपी काकाच्या मित्रानेही १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुली या सख्ख्या बहिणी आहेत.
दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने यातील एका मुलीने पोटात दुखत असल्याने शेजारी राहत असलेल्या लोकांना सांगितले. आणि यातूनच आज सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
हा प्रकार शेजारी असलेल्या फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी तातडीने खडक पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाईक करीत आहेत