Superdog Max मुंबई : मुंबई पोलीस दलातला एकमेव गोल्ड मेडलिस्ट सुपरडॉग मॅक्स याचे विरारमध्ये रविवारी (ता.२३) निधन झाले आहे. त्याच्या निधनामुळे अख्ख मुंबई पोलीस दल हळहळल व्यक्त करीत आहे. (Superdog Max)
मॅक्स हा १९९३ पासून ते आतापर्यंत मुंबई पोलीस दलातला एकमेव गोल्ड मेडलिस्ट सुपरडॉग होता. मॅक्स हा यावर्षीच एप्रिल महिन्यात आजारपणामुळे रिटायर झाला होता. त्यानंतर त्याला विरारमधल्या एका कुटुंबाने दत्तक घेतलं होते. त्याचा सांभाळ तेच करत होते.
लॅब्रोडॉर जातीचा मॅक्स अवघ्या काही महिन्यांचाच होता जेव्हा तो मुंबईत पोलीस दलात दाखल झाला. सन २०१२ साली तो पोलीस दलात दाखल झाला. जवळपास दीड वर्ष त्याचं पुण्यातील डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये रितसर ट्रेनिंग झाले होते. त्यानंतर २०१३ पासून ऑफिशिअली तो मुंबई पोलिसांसोबत काम करु लागला.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांच्या अंडर मॅक्सने कमाल कामगिरी करुन दाखवली. प्रचंड एक्टीव्ह, रात्रीच्या अंधारातही गोष्टी शोधण्यास पोलिसांना मदत करणं, एक्स्प्रोझिव्ह शोधून काढणं, सेलिब्रिटींच्या सुरक्षा व्यवस्थेत चोख कामगिरी बजावणं, यासाठी त्याचं प्रचंड कौतुकही व्हायचं.
म्हैसूरमधल्या एका स्पर्धेत मॅक्सने अवघ्या १० मिनिटात एक्स्प्लोझिव्ह शोधून दाखवण्याची किमया करुन दाखवली होती. मॅक्स एक्स्प्लोझिव्ह शोधण्यात माहीर होता. बॅग असो, जमिनीखाली असो किंवा मग माणसाच्या शरीरात. कुठूही लपवण्यात आलेलं एक्स्प्लोझिव्ह शोधण्यात मॅक्स तरबेज होता.
बॉम्ब डिटेक्शन एन्ड डिसपोजल स्क्वॉडमध्ये मॅक्सने मुंबई पोलिसांत कामगिरी केली. २०१६ साली त्याने गोल्ड मेडल जिंकलं. चपळ आणि शोधकार्यात माहीर असलेल्या हा ट्रेन्ड डॉग मुंबई पोलिस दलात अल्पावधितच सगळ्यांचा लाडका झाला होता.
दरम्यान, मॅक्सने आपली कारकिर्द गाजवली. मेडल्स जिंकली. पण हेल्थ इश्युमुळे याच वर्षी एप्रिल महिन्यात त्याला मुंबई पोलीस दलातून निरोप देण्यात आला. त्यानंतर अवघ्या ३ महिन्यातच मॅक्सने जगाचा निरोप घेतला. मॅक्सचं जाण पोलीस दलातील अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.