Suicide | शिरूर, (पुणे) : शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी (ता. ०८) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे.
अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय – ३३ रा. रामलिंग ता. शिरुर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड (रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा जि. नगर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव गायकवाड यांना सोमवारी दुपारी चार वाजता त्यांची दुसरी मुलगी शलाका सुपेकर (रा. श्रीगोंदा) हिने फोन करुन सांगितले कि, बहिण अंजली ज्ञानदेव गायकवाड हिने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेतली आहे.
दरम्यान, ज्ञानदेव गायकवाड, मुलगी शलाका सुपेकर यांच्यासह शिरुर येथील वेदांता हॉस्पीटल येथे गेले. त्यावेळी वेदांता हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी त्यांची मुलगी अंजली गायकवाड हिचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Sucide News : पत्नीसह तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या ; एकास अटक
Sucide : पुण्यात हुंडा न दिल्यावरून नवविवाहितेचा छळ; महिलेची राहत्या घरात आत्महत्या..!
Suicide | प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून परिचारिकेची आत्महत्या ; लोहगाव परिसरातील घटना..