उरुळी कांचन (पुणे)- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मातोश्री डेव्हलपर्सचे मालक व युवा उद्योजक प्रतिक बाळासाहेब काळंगे (वय ३०, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांची आत्महत्या ही प्लॉटिंगमधील व्यावसायिक अपयशातुन आल्याचे स्पष्ठ झाले असुन, प्रतिकने आत्महत्या केलेल्या खोलीत सुसाईड नोट मिळाली असल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मातोश्री डेव्हलपर्सचे प्रतिक काळंगे यांचा उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीत मातोश्री डेव्हलपर्स या नावाने प्लॉटिंग व्यवसाय होता. प्रतिक हे मागिल दोन दिवसापासून घरी आले नसल्याने, ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती.
प्रतिक यांच्या नातेवाईकांच्यासह लोणी काळभोर पोलिस प्रतिक यांचा शोध घेत असतांना, आज (बुधवारी) सकाळी शेवाळवाडी येथील आराध्या लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. लॉज मधील वेटर यांनी दरवाजा उघडला नसल्याने दुसऱ्या चवीने दरवाजा उघडला असता, प्रतीक फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी त्याला खाली उतरवून अंग झडती घेतली असता सुसाईड नोट मिळाली.
दरम्यान, मागिल वर्षभऱापासुन शासनाने अकरा गुंठे व त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर शासनाने निर्बंध लादल्याने, व नियम बदलल्याने खरेदीखते होत नव्हती. यामुळे पुर्व हवेलीसह जिल्हातील बहुतांश डेव्हलपर्स आर्थिक अडचणीत सापडले आहेत. इतर प्लॉटिग व्यावसायंकाच्या प्रमानेच प्रतिकही ही आर्थिक अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. याच नैराश्यातुन त्यांनी आत्महत्या केली असावा असा अंदाज त्यांचे मित्र मंडळी व जवळचे नातेवाईक लावत आहेत. एका तरूण व्यावसायिकाने आत्महत्या करून आपले जिवण संपवल्याने उरूळी कांचनसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.