Solapur News : सोलापूर : सोलापूरातून हादरवणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची सत्तूरने गळा कापून हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः पतीने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप मध्ये ही घटना घडली आहे. (Terrible end of family dispute in Solapur..; Killing his wife by slitting her throat; And husband’s suicide too)
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील घटना
लाडलेसब हुसेनी नदाफ (वय वर्षे 65) असे आरोपी पतीचे नाव आहे तर नगुमा लाडलेसब नदाफ (वय वर्षे 63) असे खून करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे. (Solapur News) याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये आरोपी लाडलेसब हुसेनी नदाफ याने पत्नी नगुमा यांची सत्तुरने गळा कापून हत्त्या केली. त्यानंतर आरोपी लाडलेसब हुसेनी नदाफने घराशेजारी असणाऱ्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली.(Solapur News) या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Solapur News : यल्लम्मा देवीच्या यात्रेहून परतणा-या कारला ट्रकची धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू!