Sunday, August 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोहगडावरील मृत्यूप्रकरणाला धक्कादायक वळण, ‘हुडी मॅन’ आणि चेतनने घातलेले कपडे पूर्ण वेगळे, तपासाची चक्रे फिरणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 July 2026, 8:17

पुणे : लोहगड किल्ला हत्या प्रकरणाने आता एक वेगळे वळण घेतले असून, यात रोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. व्यावसायिक केतन अग्रवाल याला कड्यावरून ढकलून मारल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचे भक्कम पुरावे गोळा करत आहेत.या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक अतिशय महत्त्वाचा धागा लागला आहे.

ज्यावेळी लोहगडावर घटना घडली त्या वेळी घटनास्थळाच्या परिसरात हुडी घातलेला एक तरुण दिसला होता, जो चेतन चौधरी असल्याचा संशय आहे. मात्र, पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा एक वेगळीच माहिती समोर आली. चेतन घरातून निघताना भलत्याच कपड्यांमध्ये होता, पण लोहगड परिसरात मात्र तो हुडी घातलेल्या अवस्थेत दिसला. गुन्ह्याची ओळख लपवण्यासाठी चेतनने आपले कपडे बदलले असावा, असा पोलिसांना दाट संशय आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या त्या मूळ कपड्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

या हत्येमागील मूळ कारण आणि आर्थिक बाजू समजून घेण्यासाठी पोलीस आता आरोपींच्या बँक खात्यांची कसून चौकशी करत आहेत. त्यांचे ऑनलाइन व्यवहार, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. या आर्थिक देवाणघेवाणीतून हत्येचा नेमका हेतू स्पष्ट होईल, असा विश्वास पोलिसांना आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

 

18 जून रोजी केतन अग्रवाल हा सिया गोयलसोबत लोहगड किल्ल्यावर गेला होता. तिथेच कड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला. सियाने सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या चौकशीत तिचा हा बनाव उघडा पडला.

पोलिसांनी नुकतेच सिया आणि चेतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनाक्रम कसा घडला याचे प्रात्यक्षिक केले. यामध्ये केतनचा एक डमी पुतळा कड्यावरून खाली ढकलून पाहण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस आता युद्धपातळीवर करत आहेत.यातून आता लोहगडावरील ‘हुडी मॅन’ आणि चेतनने घातलेले कपडे पूर्ण वेगळे असल्याचा संशय आल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यातील खामगावात बिबट्याचा धुमाकूळ! एकाच रात्री 17 बोकडांचा फडशा; पशुपालकाचे मोठे नुकसान

Sunday, 23 August 2026, 12:04

वाखारीत गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; 2 हजार लिटर रसायनासह 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 23 August 2026, 12:02

बनावट लग्न लावून दिलं अन् दलालांनी २ लाखांत मुलीला विकलं! बनावट कागदपत्र, आधार कार्ड अन् खोटे नातेवाईक; नेमकं काय घडलं?

Sunday, 23 August 2026, 12:00

बोरीऐंदी फाट्यावर तिघांचा धुडगूस! कट मारल्याच्या संशयातून कार अडवून एकाला कोयत्याच्या मुठीने मारहाण

Sunday, 23 August 2026, 11:48

वरवंडमध्ये शेतरस्त्यावरून वाद पेटला, रस्ता अडवून शेतकरी कुटुंबाला शिवीगाळ; 5 जणांवर गुन्हा दाखल

Sunday, 23 August 2026, 11:42

सोनोरीत धोकादायक स्फोटकांचा बेकायदा साठा उघड; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त, सासवड पोलिसांची कारवाई

Sunday, 23 August 2026, 11:36
Next Post

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती आता कमी होणार, किती उतरणार किंमत?ग्राहकांना दिलासा मिळणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp