मुंबई : राज्यात सद्या पोलीस भरती २०२४ प्रक्रीया सुरु आहे. १९ जूनपासून पोलीस भरती सुरु आहे. पोलीस भरती प्रक्रीयेत मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. पोलीस भरतीत आता मैदानी चाचण्यामध्ये तरुणांणी आपल्याला जादा गुण येण्यासाठी स्टीरॉईड जवळ बाळगल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात चार उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण १७ हजार पदासाठी १७ लाख उमेदवारांनी अर्ज केले गेले आहेत. मीरा-भाईदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालया मार्फत २३१ पोलीस शिपाई पदांसाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेची मैदाणी चाचणी पारदर्शकरित्या संपन्न झाल्याची माहिती, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे. ७ जुलै रोजी लेखी परीक्षा राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तानी दिली आहे.
मीरा-भाईदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत राबवण्यात येणारी भरती पारदर्शकरित्या संपन्न झाली आहे. पारदर्शकपणे भरती पार पडावी यासाठी लाचलूचपत विभाग, नार्कोटिक्स विभाग, देखील मैदानात उपस्थित होते. कोणत्याही प्रकारच्या उत्तेजक पदार्थांचे सेवन मैदाणी चाचणीला येताना उमेदवारांनी करू नये असे आयुक्तालयाच्या मार्फत सांगण्यात आले होते. मात्र मैदानी चाचणीला येताना चेकिंग दरम्यान ४ पुरुष उमेदवारांनी मैदानी चाचणी दरम्यान चांगले गुण मिळवण्यासाठी स्टीरॉईड सोबत बाळगल्याचे निष्पन झाले आहे. त्या चारही उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाचणी दरम्यान महिला उमेदवाराला चक्कर..
मैदानात चाचणी दरम्यान एक महिला चक्कर आल्याने बेशुद्ध पडल्याची घटना घडली होती. मात्र रुग्णवाहिका, डॉक्टर सर्व सोय उपलब्ध असल्याने लगेच उपचार मिळाला आहे. पावसामुळे १९ जूनपासून सुरु झालेली मैदाणी चाचणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करून नंतर २५ जून ते १ जुलै २०२४ पर्यंत सदर मैदानी चाचणी मीरारोड पूर्वच्या पालिकेच्या मैदानात राबवण्यात आली आहे.