Shital Mhatre : शिवसेनेच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माॅर्फ व्हिडीओ प्ररणामुळे आज वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभेत मोठी खडाजंगी झाल्याने नंतर कारवाईला वेग आला आहे.
माॅर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह इतर तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दुर्गे हे आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत. त्यामुळे आता राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे सामील झाले होते. या रॅलीतील एक व्हिडिओ मॉर्फ करुन तो व्हायरल करण्यात आला होता. ‘मातोश्री’नावाच्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यानंतर ठाकरे व शिंदे गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती.
म्हात्रे यांनी यामागे ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला होता. आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांचा व्हिडिओ मार्फ करणाऱ्या मुख्य आरोपीच्या शोध घेण्यासाठी दहिसर पोलिसांनी फेसबुक कंपनीला देखील पत्र पाठवले होते. पोलीसांनी मातोश्री पेज चालवणाऱ्या विनायक डायरेला अटक केली आहे. रवींद्र चौधरी यांनी विनायक डावरेला व्हिडिओ व्हायरल करायला दिला असल्याचा संशय आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनाही पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे.