Shirur News : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील अवैध गावठी हातभट्टीवर शिरूर पोलिसांनी रविवारी छापा
टाकला. या छाप्यात पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनासह २ लाख रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे. तर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Shirur News)
२ लाख रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट.
बाळू रुपाजी मुंजाळ (रा.मुंजाळवाडी, कवठे येमाई, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सोनू तावरे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.(Shirur News)
पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौठे येमाई (ता. शिरूर) येथील आरोपी बाळू मुंजाळ हा लपून अवैध गावठी दारू गाळप करत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ३२ बॅरल मध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले ६६०० लिटर कच्चे रसायन जप्त करून पंचासमक्ष जागीच नष्ट केले आहे.(Shirur News)
दरम्यान, याप्रकरणी पोलीस अंमलदार सोनू तावरे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी बाळू मुंजाळ यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार माणिक मांडगे करीत आहेत.(Shirur News)
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील,पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, पोलीस नाईक विशाल कोथळकर, पोलीस अंमलदार रघु हाळनोर, दीपक पवार, प्रवीण पिठले आणि सोनू तावरे यांच्या पथकाने केली आहे.(Shirur News)
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक संजय जगताप म्हणाले कि, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाया करण्यासाठी पथक तयार करण्यात येणार आहे. आणि पथकाच्या मार्फत कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. तसेच या प्रकारचे वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर MPDA व तडीपार या सारख्या कडक कारवाया थोडया दिवसातच केल्या जाणार आहे.