Shirur News लोणी काळभोर : शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने विवाहितेवर चाकूने खुनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने तब्बल ९ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला ६ वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम चांडक यांनी दिले आहेत. (Shirur News)
अलीम यासीन शेख (वय ३४, रा दत्तवाडी, निमोणे ता. शिरूर जि पुणे) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार हा ११ मार्च २०१७ रोजी घडला होता. (Shirur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सून घराच्या पाठीमागे साफसफाईचे काम करत होती. तेव्हा आरोपी अलीम शेख तेथे आला आणि फिर्यादी यांच्या सूनेकडे शरीरसुखाची मागणी केली. तेव्हा तिने नकार दिला. दरम्यान, शरीरसुखास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपी अलीम शेख याने फिर्यादी यांच्या सुनेला खाली पाडले व जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर चाकूने वार केले.
सून जोरजोराने ओरडत असल्याच्या आवाज आल्यानंतर फिर्यादी त्वरित घराच्या पाठीमागे गेल्या असता, सून रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले आणि आरोपी अलीम शेख हा तेथून पळून जाताना आढळून आला. नागरिकांच्या मदतीने सुनेला उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेव्हा सुनेला माहिती विचारली असता, तेव्हा हे धक्कादायक कारण समोर आले आहे. (Shirur News)
याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपीच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी अलीम शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सदर गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. मिलिंद दातरंगे यांनी न्यायालयात युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला ६ वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश न्यायाधीश श्याम चांडक यांनी दिले आहेत.
तब्बल ९ साक्षीदार तपासले
न्यायालयाने या खटल्यात तब्बल ९ साक्षीदार तपासले आहेत. या खटल्यात सरकारी वकील ॲड. मिलिंद दातरंगे यांना शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रभारी अधिकारी संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. ए. क्षीरसागर, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत, महिला अंमलदार रेणुका भिसे व एस. बी. रणसर यांची मदत मिळाली.