Shirur News : न्हावरे, (पुणे) : न्हावरे-निर्वी रस्त्यावर मारणे-सात्रस वस्ती जवळ बुधवारी (ता. 29) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Shirur News

शोभा रामदास इथापे (वय 55) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती रामदास नानाभाऊ इथापे (वय 61)हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही मूळचे लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा,जि.अहिल्यानगर) येथील असून, गेल्या काही वर्षांपासून कामानिमित्त पुण्यातील लोहगाव येथे वास्तव्यास होते. Shirur News
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामदास इथापे हे त्यांच्या पत्नीसमवेत खांडवी (ता. कर्जत,जि. अहिल्यानगर) येथील सासरवाडीतून लोहगावकडे स्वतःच्या चारचाकी वाहनाने जात होते. दरम्यान बुधवारी (ता.29) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास न्हावरे परिसरातील मारणे-सात्रस वस्ती जवळ त्यांच्या कारचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कारची जोरदार धडक बसली. Shirur News
या धडकेत दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना कारमधून बाहेर काढले आणि न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र,शोभा इथापे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रामदास इथापे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले आहे. Shirur News
या प्रकरणी शिवाजी मारुती इथापे (वय 50) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निलेश शिंदे करीत आहेत.या अपघातामुळे न्हावरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून,रस्त्यांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Shirur News






