Monday, June 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor Snake News : वनवे, उत्खनन आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा..!नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याने शिंदेवाडीत फुरसे सापाने दिला ९ पिल्लांना जन्म

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 April 2026, 10:31

विशाल शिंदे
Bhor Snake News नसरापूर, ता. 30 : शिंदेवाडी (ता. भोर) येथे घडलेली घटना केवळ दुर्मिळ नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे. डोंगर माथ्यावर लागलेल्या वनव्यामुळे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याने फुरसे सापाला खाली स्थलांतर करावे लागले आणि त्याच अवस्थेत त्याने तब्बल ९ पिल्लांना जन्म दिला. निसर्गावर होत असलेल्या मानवनिर्मित अत्याचाराचे हे जिवंत चित्र समोर आले आहे. Bhor Snake News

मिळालेल्या माहितीनुसार, डोंगर भागात वाढते वनवे, बेकायदा मुरूम उत्खनन आणि अनियंत्रित विकासकामांमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अधिवास नष्ट झाल्याने सापांसह अनेक प्राणी गावांकडे स्थलांतर करत आहेत. शिंदेवाडीतील घटनेतही डोंगरावरील आगीपासून बचाव करण्यासाठी खाली आलेल्या फुरसे सापाने प्रसूती केली, हा गंभीर इशारा मानला जात आहे. Bhor Snake News

 

सर्पतज्ञ शंकर वाडकर यांनी या सापाला सुरक्षितपणे पकडून स्थलांतरित करताना तो प्रसूती अवस्थेत असल्याचे लक्षात आणले. त्यानंतर त्या सापाने ९ पिल्लांना जन्म दिला. फुरसे सापाची पिल्ले प्रत्यक्ष पाहणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते, त्यामुळे ही घटना विशेष ठरली असली तरी तिच्यामागील कारणे अत्यंत चिंताजनक आहेत. Bhor Snake News

परिसरात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट्स, फार्महाऊस उभारणी आणि मुरूमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. “वनवे आणि उत्खननावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. कडक कारवाई न झाल्यास वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल,” असा इशारा पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते यांनी प्रशासनाला दिला आहे. Bhor Snake News

दरम्यान, साप आणि त्याची सर्व पिल्ले सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली आहेत. मात्र, ही घटना प्रशासनासाठी ‘अलार्म बेल’ ठरत असून, पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अन्यथा निसर्गाचा समतोल ढासळून भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे. Bhor Snake News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

MahaOnline server : पूर्व हवेलीत महाऑनलाइनचा सर्वर 'डाऊन' ; तांत्रिक बिघाडामुळे 'आपले सरकार' पोर्टलचे कामकाज बंद सलग तीन दिवस सेवा ठप्प! ऐन सुट्ट्यांच्या तोंडावर नागरिक हवालदिल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.