युनुस तांबोळी
Shirur News शिरूर: शिरूर शहरामध्ये वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ वाहन चालकांवर कडक कारवाई करून शिरूर पोलिसांनी तब्बल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केलेली ही धडक कारवाईने शहरामध्ये वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून काळ्या काचा केलेल्या वाहन चालकांमध्ये चांगलीच धडकी बसली आहे. (Shirur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एसटी स्टॅण्ड, बिजे कॅार्नर, सी टी बोरा कॅालेज, निर्माण प्लाझा या परीसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके,वीरेंद्र सुम्बे ,अर्जुन भालसिंग,महिला अंमलदार भाग्यश्री जाधव व चार होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली होती.
दरम्यान, ट्रिपल सीट, विना लायसन्स गाडी चालविणे, विना नंबर प्लेट, ब्लॅक फिल्मलिंग ( काळा काचा ) यांच्यावर करण्यात आली आहे
यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे केल्या जाणार आहेत. ग्रामिण भागात देखील या पुढील काळात कारवाई केल्या जातील. त्यातून वाहतूक नियमाचे उल्लंघन होणार नाही. याबाबत दक्षता घ्यावी. असे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.