युनुस तांबोळी
Shirur शिरूर, (पुणे) : शिरुर तालुक्यात बिबट्याची दहशत असताना त्या पाठोपाठ आता पिसाळलेल्या कोल्ह्याने भरदिवसा तीन शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील तामखरवाडीत ही घटना घडली.
दशरथ मारुती मुंजाळ (वय – ७०), पूजा विनोद कळकुंबे (वय -२५), सुरेश मारुती चोरे (वय- ४०) अशी हल्ला केलेल्या तीन शेतकऱ्यांची नावे आहेत. शेतकऱ्यांवर कोल्हयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला झाला आहे. हा कोल्हा पिसाळलेला असावा असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
पूजा कळकुंबे ही कांद्याच्या शेतात कांदे काढत असताना अचानक कोल्हयाने पूजा हिच्या चेहऱ्यावर डोळ्याच्या वरच्या बाजूला चावा घेतला, तिथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा करताच कोल्ह्याने धूम ठोकली. काही वेळातच दशरथ मुंजाळ हे शेतात गवत कापत असताना त्यांच्या हाताला चावा घेतला. पुन्हा तासभरात सुरेश चोरे यांना पायाला चावा घेतला. त्यांना टाकळी हाजी येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार घेऊन प्राथमिक स्वास्थ्य केंद्रावर उपचारासाठी नेहण्यात आले.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सर्वाना पुढील उपचारासाठी शिरूर येथे पाठविण्यात आले. घटनेची माहिती समजताच माजी सरपंच दामुआण्णा घोडे, सरपंच अरुणा घोडे, सोसायटीचे संचालक संतोष गावडे यांनी रुग्णांची भेट घेतली.
याबाबत बोलताना शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले
“टाकळी हाजी परिसरात बिबट्या पाठोपाठ कोल्हयाचा हल्ला हा एक नवीन विषय आहे. या कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी वनविभगाचे विशेष पथक पाठविण्यास येणार आहे. या भागातील नागरिकांनी लहान बालके, मजूर, शेतकरी, तसेच पशुधनाची काळजी घ्यावी. तात्काळ संबंधित परिसराचा वनविभाग तपास करीत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Shirur News : चतुर्थ श्रेणी पदासाठी योग्य सन्मान मिळवून दिला ; प्राचार्य उत्तमराव आवारी यांचे मत
Shirur : भंडारा, खोबरे चा तळीभंडार यळकोट यळकोट जय मल्हार जांबूत येथील खंडोबा देवाची यात्रा उत्साहात