अक्षय भोरडे
Shikrapur News : तळेगाव ढमढेरे (पुणे) जुन्या वादातून दुचाकीवर निघालेल्या एकावर तलवार व लोखंडी गजाने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना धानोरे (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी तिघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Shikrapur News)
तिघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
तुषार दादा भोसुरे, प्रदीप बाळासाहेब भोसुरे व एका अनोळखी युवक (रा. सर्वजण धानोरे ता. शिरुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संतोष चकोर (धानोरे ता. शिरुर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सानिका संतोष चकोर (वय १९ रा. धानोरे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.(Shikrapur News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चकोर यांचे व त्यांच्या गावातील दादासाहेब भोसुरे यांचे पालखी सोहळ्यात किरकोळ वाद झाला होता. त्यांनतर बुधवारी (ता. ०५) संतोष चकोर हे त्यांची मुलगी सानिका हिच्या शालेय कामासाठी तळेगाव ढमढेरे येथील विद्यालयात आले होते. शालेय कामकाज आटोपून त्यांची मुलगी सानिका चकोर व संतोष चकोर दोघे वेगवेगळ्या दुचाकीहून धानोरे येथे घरी निघाले होते.(Shikrapur News)
यावेळी अचानक तुषार भोसरे, प्रदीप भोसुरे यांच्यासह एका अनोळखी युवकाने संतोष चकोर यांची दुचाकी रस्त्यावर पाडून संतोष यांना शिवीगाळ दमदाटी करत तू आमच्या बापाच्या नादी लागतो का, तुझा आज शेवटच करतो असे म्हणून संतोष यांच्यावर तलवार व लोखंडी गज व दगडाने हल्ला करत जबर जखमी केले. यावेळी संतोष चकोर यांच्या डोक्यात तलवार लागल्याने ते बेशुध्द होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले.(Shikrapur News)
दरम्यान, मुलगी सानिका हिने आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक गोळा झाल्याने मारहाण करणारे सर्व हल्लेखोर पळून गेले. याबाबत सानिका चकोर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तुषार भोसुरे, प्रदीप भोसुरे व एका अनोळखी युवकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस शिपाई अमोल नलगे हे करत आहे.(Shikrapur News)