Satara News : सातारा : राहत्या घरातील स्वयंपाकगृहात नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर सुनेच्या आत्महत्येनंतर सासूने हाताच्या नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे रविवारी घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर संतप्त नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कऱ्हाड तालुक्यातील विंग येथील घटना
नीलम अनिकेत माने (वय २१) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे, तर सासू राणी अंकुश माने (वय ३४) हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. . तीन महिन्यांपूर्वीच नीलम यांचा विवाह झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील नीलमचा तीन महिन्यांपूर्वी विंग येथील अनिकेत मानेशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम स्वयंपाकगृहात झोपली होती. तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे जण बाहेरच्या खोलीत झोपले होते. (Satara News) रविवारी सकाळी सातच्या सुमारास नीलम दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून स्वयंपाकगृहात प्रवेश केला. त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. ही घटना पाहून सासू राणी माने यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. (Satara News) तसेच घटना समजल्यानंतर मृत नीलमचे माहेरचे नातेवाईक कऱ्हाडात दाखल झाले. त्यांनी कऱ्हाड तालुका पोलिस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्यात येत होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : सातारा शासकीय विश्रामगृहाचा गाढवांनाही लागला लळा…!
Satara News : साताऱ्यात मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू