Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mulshi News : पेट्रोलपंपावर हातचलाखी करून ३५ हजारांची लूट ; मुळशीतील घटना… वाचा काय केला बहाणा?

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 June 2023, 17:38

Mulshi News  मुळशी : नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या होन्डा अमेज कारमधून ते दोघे खाली उतरले… कारमध्ये तीनशे रुपयांचे पेट्रोल टाकण्यास सांगितले… दरम्यान, आपण लंडनमधून आल्याचे सांगत परदेशी चलन दाखवून पट्रोलपंपावरील व्यक्तींचा विश्वास संपादन केला… (Mulshi News)  भारतीय चलन दाखवा, अशी मागणी करत पेट्रोलपंपावर जमा झालेली रक्कम त्यांनी पाहण्यासाठी घेतली… रक्कम परत करताना पॅंटच्या खिशात ठेवल्याचे भासवले अन् हातोहात फसवणूक करून, त्या दोघांनी तेथून पोबारा केला… फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा वेळ निघून गेली होती. मुळशी तालुक्यातील अकोले येथील ढमाले एचपीसीएल पेट्रोलपंप येथे हा धक्कादायक प्रकार घडला. (Mulshi News)

 पौड पोलीस ठाण्यात दाखल 

याप्रकरणी अशोक दादू चव्हाण (वय ५२, रा. अकोले, मुळशी) यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पौड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ढमाले हे एचपीसीएल पेट्रोलपंप येथे गेले आठ वर्षांपासून पेट्रोल व हवा भरून देण्याचे काम करतात. शनिवारी (ता. २४) संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चव्हाण आणि रमेश तुकाराम शिंदे (सध्या रा. अकोले गाव) हे दोघे पंपावर पेट्रोल व डिझेल भरून देण्यासाठी कामावर होते.

दरम्यानच्या काळात नंबर प्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची होन्डा अमेज कार आली. त्यातील दोन व्यक्ती गाडीतून खाली उतरल्या. एकाने अशोक चव्हाण यांना ३०० रुपयांचे पेट्रोल टाका,अशी हिंदीतून सूचना केली. आम्ही लंडन येथील रहिवाशी आहोत असे सांगून, परदेशी चलन दाखवले. आम्हाला तुमच्याकडील भारतीय चलन दाखवा, तुमच्याकडे कोणकोणत्या दराच्या नोटा आहेत, त्या कशा असतात ते आम्हाला पहायचे आहे, असे सांगत दोघांचाही विश्वास संपादन केला. त्यावरीन चव्हाण यांनी पेट्रोल विक्रीची जमा झालेली रोख रक्कम संबंधित व्यक्तीच्या हातात पाहण्यासाठी दिली.

 

त्यानंतर नोटा हातात घेवून तुमचे भारतीय चलन छान आहे, असे म्हणत चव्हाण यांनी दिलेली रोख रक्कम त्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवली आणि ते निघून गेले. त्याच दरम्यान चव्हाण यांचा सहकारी रमेश शिंदे तेथे आला आणि नंबर प्लेट नसलेल्या एका कारमधील व्यक्तीने माझ्याजवळ सुटे पैसे मागून हातचलाखीने माझ्याजवळील काही रक्कम लांबवली, अशी तक्रार करू लागला. त्यावेळी चव्हाण यांनी स्वतःच्या खिशात ठेवलेली रक्कम बाहेर काढून मोजून पाहिली असता, ती कमी असल्याचे आढळले.

दरम्यान, रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ड्युटी संपल्यानंतर दोघेही पंपाचे मालक प्रकाश ढमाले यांना हिशेब देत होते. त्यावेळी आयलेन्ट मीटर रिंडीगप्रमाणे जी रक्कम जमा झाली होती त्यापैकी १४,५०० रुपये रोख रक्कम कमी असल्याचे समजले. तसाच प्रकार रमेश शिंदे यांच्याबाबत देखील घडला होता. त्यांच्याकडील २०,५०० रूपये रोख रक्कम कमी असल्याचे आढळले.

चोरी झाल्याचे कळताच पंपमालक प्रकाश ढमाले यांच्यासह तिघांनी मिळून सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, समजले की पांढऱ्या रंगाच्या होन्डा अमेज कारमधून आलेल्या त्या व्यक्तींनी हातचलाखी करून दोघांकडील मिळून ३५ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. हातचलाखी करून फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूद्ध पौड पोलीस ठाण्यात तकार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पौड पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Satara News : सातारा हादरले ! नवविवाहित सुनेने केली आत्महत्या; पाहताच सासूचादेखील आत्महत्येचा प्रयत्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.