Satara News : सातारा : साताऱ्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिवलग मित्राचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वळणावर दुचाकी आणि टेम्पोच्या भीषण अपघात होऊन त्यामध्ये दुचाकीवर असलेल्या या मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात खंडाळा तालुक्यातील पंढरपूर फाटा-फलटण रस्त्यावर लोणी येथे गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महाबळेश्वरला फिरण्यासाठी तीन मित्र गेले असताना हा अपघात घडला रस्त्यात पोलीस दिसल्यामुळे एकजण खाली उतरला त्यामुळे सुदैवाने तो वाचला.
मनोज परमार (वय 21) व अजय जाधव (वय 21) दोघे राहणार सुरवडी अशी अपघात मृत्यू झालेल्या या मित्रांची नावे आहेत. शिरवळ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पंढरपूर फाटा-फलटण रस्त्यावर लोणी येथे घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, तीन मित्र मिळून गुरुवारी पाचगणी, महाबळेश्वरला फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान परत येत असताना पंढरपूर फाट्यावर पोलीस वाहनांची तपासणी करत होते. (Satara News) यावेळी दुचाकीवर ट्रिपल सीट असणाऱ्या तिघांपैकी एकजण गाडीवरून खाली उतरला. नंतर मनोज व अजय दोघे पंढरपूर फाट्यावरून सुरवडीकडे जात असताना फलटणकडून येणाऱ्या लोणी येथील एका वळणावर टेम्पोला दुचाकीची जोराची धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यानी घटनेचा तपास करून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : साताऱ्यात मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू