अजित जगताप
Satara News | वडूज, (सातारा) : वडूज परिसरात नोकरी व्यवसाय काम धंद्यानिमित्त गडबडीत घराबाहेर पडत असतात. परंतु, वडूज नगरीत काही रिकामटेकडे महाभाग हे सकाळच्या प्रहरी दारू व्यसनापाई “टोल” वसुलीसाठी थांबत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची नजर चुकवून काही जणांना ये जा करावी लागत आहे. याबाबत केव्हा बदल घडणार ? अशी अपेक्षा व्यक्त वडूजकर सामान्य माणूस करीत आहे. महिला वर्गानाही काही मध्यापी मंडळींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे
सध्या खटाव तालुक्यातील वडूज परिसरात अधिकृत दारूचे दुकान आहेत. त्याच्या शेजारीच शासकीय कार्यालय, दवाखाने, बाजार पेठ व विद्यालय आहेत. या ठिकाणी किमान २०० ते २५० नोकरदार मंडळी तसेच लघुउद्योग व व्यवसाय करणारे काम धंदेवाले घाई गडबडीत ये जा करत असतात. त्यांना काही ओळखीचे व्यसनी रिकामटेकडे अडवून पाच ते दहा रुपये गोळा करून आपला दिवसभरचा कोटा पूर्ण करतात. त्यांना जर टोल दिला नाही. तर सकाळच्या आरंभ काही जण शिव्या शाप देतात. त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नोकरदार मंडळी करीत आहेत.
बारकाईने जर विचार केला तर वडूज नगरीत ७० टक्के परप्रांतीय कारागिरी हे दररोज व्यवसाय निमित्त घराबाहेर पडतात. परंतु स्थानिक काही तरुण मंडळी विना काम वसूल करी दाम अशा पद्धतीने इतरांना त्रास देतात. हा त्रास वाढल्यामुळे आता लोकांनी रिकामटेकड्यांना पैसे देण्यापेक्षा त्यांच्याकडून आजूबाजूचा प्लास्टिकचा कचरा गोळा करून तो एकत्र साठवून त्याची विल्हेवाट करून घ्यावी नंतरच टोल दयावा अशी रास्त मागणी होत आहे.
दरम्यान, खऱ्या अर्थाने त्यांना कष्ट करणे याचे ही मोल कळणार आहे. अन्यथा घरादारावर तुळशीपत्र ठेवून दारूसाठी सकाळी उठून रिकामटेकड्यांची भिक मागण्याची योजना बंद होईल आणि फुकटचे पैसे घेणाऱ्यांना त्याचे चांगले मोल कळले. त्यांची संख्या कमी असली तरी किमान आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याबाबत लवकरच जनजागृती व व्यसन मुक्ती शिबिर आयोजित करण्यासाठी सामाजिक संघटना यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल अशी स्थिती असल्याचे बोलले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News | वडूजमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची गळती झाल्याने स्फोट ; दोन महिला जखमी
Loni Kalbhor News | लोणी काळभोर हद्दीतील नवीन उजवा मुठा कालव्यात बारामतीचा बावीस वर्षीय तरुण बुडाला