अजित जगताप
(Satara Crime) वडूज : लहानपणी सर्वांचा आवडता खेळ म्हणजे झोका. हा झोका बांधत असताना किंवा घेत असताना त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. खटाव तालुक्यातील तडवळे या ठिकाणी एका झोक्याने चिमुकलीच्या आयुष्याची दोर कापली गेली.
याबाबत माहिती अशी की, सध्या उन्हाळ्याचे दिवस असून लहान मुलं ही आपल्या घरातील लोखंडी पाईप व तुळई अशा ठिकाणी कपड्याचा व दोरीचा झोका तयार करून मनमोराद आनंद घेतात. परंतु काही वेळेला दोर तुटती. कापड फाटते. अशा वेळेला चिमुकल्यांच्या तोल जाऊन जखमी व्हावे लागते.
गावामध्ये शोककळा..!
तडवळे (ता. खटाव) या ठिकाणी पोर्णिमा शंकर फाळके (वय ९) या चिमुकल्याच्या झोक्यालाच मान अडकल्याने अखेर जीव गुदमरून तिचा मृत्यू झाला. सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण गावामध्ये शोक कळा पसरली.
दरम्यान, अलिकडे उन्हाळ्यामध्ये असे झोके लहान मुलांना बांधून दिले जातात. काही वेळेला नदी ,विहीर व तलाव या ठिकाणी लहान मुलांना पोहण्याची आवड असते. परंतु, पाण्याचा अंदाज नसल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यूचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळेला घरातील कुटुंब तसेच समाजातील लोकांनी काळजी घ्यावी. असे पुणे प्राईम न्यूज च्या वतीने पालकांना सुचित करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Pune Crime : कामवार ठेवलेल्या कामगाराकडूनच ग्राहक अन् मालकाची लाखोंची फसवणूक!