Satara Crime | सातारा : ड्युटीवर पोहचण्यासाठी उशीर झाल्याने वाहतूक पोलिसाने चक्क होमगार्डच्या कानशिलात लावून शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना सातारा ( Satara Crime )जिल्ह्यातील तासवाडे टोलनाक्यावर मंगळवारी (ता.२१ मार्च) सकाळच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
प्रशांत पतंग देशमुख (सनद नंबर ८८१७) मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव आहे. तर पोलीस हवालदार राजपूत असे मारहाण करणाऱ्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी होमगार्ड प्रशांत देशमुख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील तासवाडे टोलनाक्यावर घडली घटना..!
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत देशमुख हे होमगार्ड आहेत. २१ मार्च रोजी सकाळी त्यांची तासवाडे टोलनाक्यावर नेमणूक होती. त्या ठिकाणी जायला वाहन न मिळाल्यामुळे कर्तव्यावर पोहोचण्यास देशमुख यांना उशीर झाला. दरम्यान, वेळेत न पोहचल्यामुळे ट्रॅफिक हवालदार राजपूत यांनी होमगार्ड प्रशांत देशमुख यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, दमदाटी करून कानशिलात लगावली.
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल…
या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार राजपूत हे “तुझ्या बापाचा नोकर आहे का?” असं म्हणताना दिसत आहे. त्यानंतर होमगार्ड सुद्धा त्यांना उलट उत्तरे देत आहेत. दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी झालेली पाहायला मिळत आहे.
दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करुनही कोणतीच कारवाई केली जात नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख याबाबत काय कारवाई करणार. याकडे गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Satara News | नवीन रस्त्यात पडतात खड्डे…तरी काही करतात नेत्याचे ‘बर्थडे