Saswad News बेलसर, (पुणे) : बेलसर (ता. पुरंदर) प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर तुळशीराम डांगे (वय – ३६) मंगळवारी (ता. २५) बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी शुभांगी डांगे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार…!
सागर डांगे हे मूळचे वडाळी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील असून ते सध्या सासवड Saswad News (ता. पुरंदर) येथे वास्तव्यास आहेत. डॉ. सागर डांगे हे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बेलसर येथील सरकारी रुग्णालयातून बेपत्ता झाले आहेत.
त्यांचा रंग गोरा, उंची 5.5 फूट, केस काळे, चेहरा उभट असून, पायात काळ्या रंगाची चप्पल, उजव्या हातावर डॉक्टरचा टॅटू गोंदवलेला आहे. अंगात जीन्स पँट व मेंदी रंगाचा शर्ट असून, त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात.
दरम्यान या वर्णनाची व्यक्ती दिसून आल्यास जेजुरी पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Saswad Crime : तुझे बाहेर संबंध आहेत म्हणत पतीने घेतला पत्नीच्या हाताचा चावा ; सासवड मधील प्रकार