Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad news : विद्युत मीटर चोरीच्या तपासासाठी गेलेल्या तरुणीवर चाकूने वार करून मारहाण ; एका पुरुषासह 9 महिलांविरुद्ध सासवड पोलिसांत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 9 May 2026, 12:36
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Saswad news : सासवड, (पुणे) : स्वतःच्या मालकीच्या जमिनीतील विद्युत मीटर चोरीबाबत चौकशीसाठी गेलेल्या एका 29 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला करून तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी एका पुरुषासह 9 महिलांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. पुरंदर तालुक्यातील खळद (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (ता. 07) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गट नंबर ८३ मध्ये हि घटना घडली. Saswad news

कु. पुष्पांजली राजेंद्र पुणेकर (वय 29, धंदा शिक्षण, रा. पुणेकर बंगलो, गंगास्पर्श सोसायटीजवळ कडनगर उंड्री, पुणे) असे मारहाण झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर बाळासाहेब फुले, (रा. फुलेमळा, खळद, ता. पुरंदर जि. पुणे, प्राची वाघमारे, व इतर अज्ञात 8 महिला (नाव व पत्ता माहिती नाही) अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. Saswad news

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पांजली पुणेकर यांची खळद येथे गट नंबर ८३ मध्ये स्वतःची मालकीची जमीन आहे. या जमिनीतील घराचे विद्युत मीटर चोरीला गेल्याने गुरुवारी (ता. 07) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विद्युत पारेषण विभागाच्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तिथे गेल्या होत्या. Saswad news

पुष्पांजली तिथे पोहोचल्या असता, तिथे उपस्थित असलेल्या बाळासाहेब फुले आणि इतर 8 अज्ञात महिलांनी त्यांना गाठले. या सर्वांनी पुष्पांजली यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. या झटापटीत त्यांचा डोळ्याचा चष्मा खाली पडून फुटला. आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत “तुझे कुटुंब संपवून टाकू,” अशी धमकी दिली. Saswad news

दरम्यान, मारहाण सुरू असतानाच आरोपी प्राची वाघमारे हिने घरामधून चाकू आणला आणि पुष्पांजली यांच्या उजव्या हातावर चाकूने 3 ते 4 वार केले. या हल्ल्यात पुष्पांजली गंभीर जखमी झाल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुष्पांजली पुणेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासवड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. Saswad news

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Thalapathy Vijay : थलपती विजय यांच्या शपथविधीवर अनिश्चिततेचे सावट? ; बहुमताच्या आकड्यावरून तमिळनाडूत सत्तानाट्य रंगले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.