Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बस बाजूला घेतल्याचा राग अनावर! चौघांनी चालकाला केली बेदम मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 31 October 2026, 18:23

शिक्रापूर, ता. 31 : बस बाजूला घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी बसचालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना शिक्रापूर येथील मलठण फाट्याजवळ पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्री घडली. या मारहाणीत बसचालक दिनकर कुबेर उंबरकर (वय 29, रा. सणसवाडी, ता. शिरूर) हे जखमी झाले असून, त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याची सोन्याची चैनही हरवल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर उंबरकर हे खासगी बस चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते याझाकी कंपनीतील कामगारांना घेऊन जात होते. मध्यरात्री सुमारे 12 वाजून 10 मिनिटांनी मलठण फाट्याजवळील कॅनल परिसरात त्यांनी आपली बस (एमएच 12 झेडयू 9334) रस्त्याच्या कडेला घेतली. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने आलेली इर्टिगा कार (एमएच 12 एक्सएम 5030) मधील चार जण खाली उतरले. बसमुळे कार बाजूला दाबली गेल्याचा आरोप करत त्यांनी उंबरकर यांच्याशी वाद घातला.

त्यानंतर चौघांनी उंबरकर यांना बसमधून खाली ओढून शिवीगाळ व दमदाटी केली. दोघांनी त्यांना पकडून ठेवले, तर एकाने त्यांच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. अन्य एकाने हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा प्रकार पाहून बसमधील कामगार ओंकार संतोष गुरव हे मदतीला धावले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या झटापटीत उंबरकर यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन हरवल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी ताराचंद भाऊसाहेब जोगदंड, उमेश हिवाळे, सचिन खंडागळे आणि रोहन शिवाजी खंडागळे (सर्व रा. सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे) यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार भोते करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

Sunday, 1 November 2026, 20:17

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 1 November 2026, 19:21

Pune News: एकामागून एक 8 चोऱ्या; अखेर दोन आंतरराज्यीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, 5.50 लाखांचा माल जप्त

Sunday, 1 November 2026, 18:54

शिक्षणात आघाडी, तरी नोकरीत सुरक्षिततेचा पत्ता नाही; पुण्यातील तरुणांसमोर नेमकं कोणतं संकट? धक्कादायक वास्तव उघड

Sunday, 1 November 2026, 18:28

गोव्याच्या सहलीने फोडलं बिंग! ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पा ऐकल्या अन् पुण्यात तरुणांनी आखला लुटीचा कट; पुढे जे केलं ते पाहून पोलीसही चक्रावले

Sunday, 1 November 2026, 18:22

कामावर जाण्यासाठी निघाली अन् काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं; फुरसुंगीतील तरुणीचा अपघातात मृत्यू

Sunday, 1 November 2026, 18:01
Next Post

दौंडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट? राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, थेट पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp