Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चेतन-सियाच्या अडचणी वाढणार? केतन हत्या प्रकरणात पहिल्याच सुनावणीला उज्ज्वल निकमांची एन्ट्री!

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 31 October 2026, 17:44

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीला अखेर सुरुवात झाली आहे. मावळमधील वडगाव न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने 2 जामीन अर्ज दाखल करण्यात आले. मात्र, सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय या अर्जांवर निर्णय घेऊ नये, अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली. त्यामुळे आता 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात उपस्थित होते. सरकारी पक्षाने खटल्याची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार न्यायालयात आरोपींवरील आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. याचवेळी आरोपींच्या वकिलांनी 2 जामीन अर्ज सादर केले. या अर्जांवर सरकारी पक्षाला बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतरच विचार व्हावा, अशी भूमिका निकम यांनी मांडली. सुनावणीदरम्यान सिया आणि चेतन हे दोघे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

या प्रकरणातील तिसरा सहआरोपी रितेश हंगे याच्यासाठी अद्याप वकिलाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे त्याला स्वतःचा वकील नेमण्यासाठी वेळ द्यावा, अशी भूमिका सरकारी पक्षाने घेतली. त्याने वकील नेमला नाही, तर न्यायालयाकडून त्याला कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही सांगण्यात आले. आता 17 नोव्हेंबरला जामीन अर्जांवर पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या आरोपानुसार, उच्चशिक्षित तरुण केतन अग्रवाल याला 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलण्यात आले. या प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर आरोप आहेत. नोव्हेंबरमध्ये उदयपूर येथे दोन्ही कुटुंबांकडून त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यांचा साखरपुडाही झाला होता.

तपास यंत्रणेच्या आरोपानुसार, सियाने ट्रेकिंगच्या बहाण्याने केतनला लोहगडावरील कमी वर्दळीच्या ठिकाणी नेले. तेथे ती त्याच्याशी बोलत असताना चेतनने मागून येऊन केतनला दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा खटला आता सुरू झाला असून, पुढील सुनावणीत काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बस बाजूला घेतल्याचा राग अनावर! चौघांनी चालकाला केली बेदम मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 31 October 2026, 18:23

सोरतापवाडीत मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला! दुकानदाराला मारहाण करून हाताला घेतला चावा; बुलेट घटनास्थळीच सोडून चोरटा पसार

Saturday, 31 October 2026, 18:18

चाकणमध्ये वाहतूककोंडीचा महाभयंकर त्रास! सकाळपासून संध्याकाळपर्यंत महामार्गावर वाहनांच्या रांगा

Saturday, 31 October 2026, 18:07

चेतन-सियाच्या अडचणी वाढणार? केतन हत्या प्रकरणात पहिल्याच सुनावणीला उज्ज्वल निकमांची एन्ट्री!

Saturday, 31 October 2026, 17:44

लाडकी बहीण योजनेचे 40 हजार रुपये मिळणार? सत्य काय, जाणून घ्या

Saturday, 31 October 2026, 17:23

मंत्री नितेश राणेंविरोधात वॉरंट! संजय राऊतांवरील विधान भोवले? माझगाव न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट; अब्रूनुकसानीच्या खटल्यात वारंवार गैरहजेरी

Saturday, 31 October 2026, 17:03
Next Post

चाकणमध्ये वाहतूककोंडीचा महाभयंकर त्रास! सकाळपासून संध्याकाळपर्यंत महामार्गावर वाहनांच्या रांगा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp