Sasvad Fire News : सासवड, (पुणे) : सासवड शहरातील दि. डेक्कन मर्चंट को – ऑपरेटिव्ह शाखेतील वातानुकुलीत यंत्रणेत शॉर्टसर्किट होवून लागलेल्या आगीत बँकेतील सर्व साहित्य जळून भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २२) सकाळी घडली आहे. या घटनेत बँकेतील फर्नीचर, इलेक्ट्रीक साधने, कागद पत्रांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. (Sasvad Fire News)
बँकेतील सर्व साहित्य जळून भस्मसात झाल्याची घटना
मिळालेल्या माहितीनुसार, संत सोपान नगर रस्त्यावरील झेंडे बिल्डिंगमध्ये नुकतेच स्थलांतर बँकेचे झाले होते. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही मिनिटातच वातानुकूलित यंत्रणेत शॉर्टसर्किट झाला आणि धूर निघाला त्यानंतर आग लागून पुढील घटना घडली. (Sasvad Fire News)
या लागलेल्या आगीमुळे बँकेतील सर्व साहित्य जळून गेलं आहे. यामध्ये मनुष्यहानी झाली नाही बँकेच्या नुकसानी बाबत संपूर्ण माहिती मिळाली नाही. मात्र बँकेतील फर्नीचर, इलेक्ट्रीक साधने, कागद पत्रांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
बँकेचे अधिकारी यांनी सासवड पोलीस स्टेशनला माहीती दिली व नगरपालिकेत अग्निशामक बंब मागितला. परंतु सासवड नगरपालिकेचा अग्निशामक बंब दुरुस्तीला गेला असल्याने उपलब्ध झाला नाही. त्यामुळे सासवड नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण यांनी जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांना संपर्क करून त्या नगरपालिकेचा अग्निशामक बंब मागितला.
दरम्यान, अवघ्या २५ मिनिटात बँकेजवळ पोहोचविला. त्यामुळे साधारणत: दीड तासानंतर आग आटोक्यात आली. याबाबत सासवड पोलीस स्टेशनला घटनेची नोंद केली आहे. (Sasvad Fire News)