Sassoon Hospital पुणे : ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून विद्यार्थिनीने खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
हा प्रकार बुधवारी (२९ मार्च) सकाळाच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या आवारात घडला. यामुळे एक खळबळ उडाली.यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आदिती दलभंजन असे इमारतीवरून उडी मारलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण…
ती मेडिकल कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. आदितीने उडी मारण्याचा प्रयत्न का केला हे अद्याप अस्पष्ट आहे.घटनेची माहिती समजताच बंडगार्डन पोलीस आणि ससून रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Pune Crime : टपाल खात्यातील आणखी एक घोटाळा उघड; लाखोंचा अपहार; डाक सहायकाविरुद्ध गुन्हा
Girish Bapat Passed Away : खासदार गिरीश बापट यांचे निधन..!
Pimpri Chinchwad News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लाच घेणारा ; लिपिक सेवेतून निलंबित…!