Sangli News : सांगली : समाजात अंधश्रद्धेची पाळेमुळे अजूनही काही ठिकाणी घट्ट रुजलेली आहेत. अशाच अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे एका निरागस मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने केलेल्या मारहाणीत कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील मुलाचा मृत्यू झाला आहे. आर्यन दिपक लांडगे (वय १४) असे या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अंनिसच्या पाठपुराव्यानंतर मंगळवारी रात्री मांत्रिकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (There is still blind faith in the society, the death of a child due to beatings by a witch doctor to remove ghosts)
अंनिसच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल
घडलेली घटना अशी की, आर्यनला सतत ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून आर्यनला एका नातेवाईक महिलेने तिच्या आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील एका मांत्रिकाकडे उपचारासाठी त्याला नेले होते. (Sangli News) त्या मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे, त्यांच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला.
कवठेमहांकाळ अंनिसचे कार्यकर्त्यांनी सदर घटनेचा पाठपुरावा केला आहे. (Sangli News) कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तात्काळ मुलाच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करुन घेतली आहे.