Sangli News : सांगली : महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी विजय आनंदराव पवार (वय ५० रा. संभाजीनगर, सांगलीवाडी) यांना कार्यालयात सव्वा लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
घरात आढळली सात लाख रुपयांची रोकड
अग्निसुरक्षा यंत्रणा बसविणार्या कंपनीला ना हरकत दाखला देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच पवार याने मागितली होती. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.
महापालिकेच्या अग्निशमन अधिकार्याच्या घरझडतीमध्ये लाच लुचपत विभागाच्या पथकाला सात लाखांची रोकड आढळून आली. (Sangli News) अग्निसुरक्षा यंत्रणा उभी करणार्या कंपनीकडून सव्वा लाख रुपयांची लाच घेत असताना या अधिकार्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री कार्यालयात अटक केली. त्याने सव्वा लाखाची लाच घेणार्या
लाचखोर अधिकारी पवार याला रंगेहात अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या सांगलीवाडीतील निवासाची झाडाझडती घेण्यात आली. (Sangli News) यावेळी त्याच्या घरातून ७ लाख १ हजार ६०० रुपयांंची रोकड मिळाली असून ही रोकड जप्त करण्यात आली असल्याचे उपअधिक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. दरम्यान पवार यांना न्यायालयाने दि. ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले.