(Sangli Crime) सांगली : सामाईक विहिरीच्या पाण्यावरून सुरु असलेल्या वादात भावकीत दहा ते पंधरा जणांनी काका-पुतण्याच्या हत्या केल्याची धक्कादायक घटना कोसारी (ता.जत, जि. सांगली) येथे नुकतीच उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जत तालुक्यासह सांगली (Sangli Crime) जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
विलास नामदेव यमगर (वय-४५) आणि प्रशांत दादासो यमगर (वय-२३) असे मृत झालेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. तर या हल्ल्यात दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके आणि विजय विलास यमगर हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोसारी या ठिकाणी यमगर ही भावकी राहते. त्यांच्या शेतामध्ये एकच सामाईक विहीर आहे. आज सकाळी पाण्याची पाळी कोणाची यावरून वाद झाला. त्यानंतर हा वाद टोकाला पोहोचला आणि यातून यमगर कुटुंबातील सुमारे दहा ते पंधरा जणांनी विलास यमगर आणि प्रशांत यमगर यांच्या कुटुंबावर हल्ला केला.
दरम्यान, या हल्ल्यात विलास यमगर आणि प्रशांत यमगर या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके आणि विजय विलास यमगर हे गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच, जत पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने जत शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
मुलीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने केला सासऱ्याचा खून ; सांगली येथील घटना..!
पुण्यातील महिला सी.ए तरुणीची सांगलीत आत्महत्या ; कारण अस्पष्ट