Rural Police | लोणी काळभोर, (पुणे) : बनावट कागदपत्राद्वारे ६ जिल्ह्यातील जी. टी. एल. इन्फ्रान्स्ट्रक्चर कंपनीचे मोबाईल टॉवर चोरणाऱ्या तीन अधिकाऱ्यांसह ५ जनांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यामुळे कुंपणानेच शेत खाल्ले असल्याची चर्चा मोबाईल टॉवर जागा मालकांमध्ये जोरदार आहे.
रमेश मल्लाप्पा गरसंगी (वय – ३३ वर्षे, धंदा- टॉवरकाम, रा. मळघन ता बसवन बागेवाडी जि. विजयपुरा राज्य – कर्नाटक), प्रशांत वामन यादव (वय – ३१, धंदा- नौकरी (जी. टी. एल. इन्फास्टक्चर लिमीटेड, नामदेव निवास, वडकी नाल्याचे जवळ, वडकी ता. हवेली, मुळ पत्ता- रा. हर्णे ता. पुरंदर), सुहास श्रीराम लाड वय -४०, सध्या रा. प्रभाकर पार्क, गोपालपटटी मांजरी बु. ता. हवेली, मुळ रा. ताकमोळी ता. चिपळुन जि. रत्नागीरी), जावेद हमीदुल्ला खान, वय ३३, व्यवसाय भंगार व्यावसायिक, रा. मंतरवाडी, शिक्षक कॉलनी, भेकराईनगर, फुरसुंगी), सचिन गणपत कदम (वय -४१, व्यवसाय नोकरी, रा. स्काय हाईटस, फ्लॅट नं. डी १००१, कात्रज कोंढवा रोड, पिसोळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सहा जिल्हयातील दहा घटना उघडकीस आणून १३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जी.टी. एल. इन्फास्ट्रक्चर कंपनीचे भारतात हजारो मोबाईल टॉवर आहेत. २००८ मध्ये काही टेलीकम्युनिकेशन कंपन्या बंद झाल्याने जी.टी.एल. कंपनीचे हजारो मोबाईल टॉवर बंद होते. मोबाईल टॉवर ज्या जागेत उभारणेत आले त्याठिकाणच्या जागा मालकांना काही इसम भेटून जी.टी.एल. कंपनीचे लेटर हेड सारखे दिसणारे लेटर हेडचा गैरवापर व बनावटीकरण करून टॉवर चोरी करत आणि कंपनीची जागा मालक यांची फसवणुक करत होते.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव गावातील पाचंगे वस्ती येथील यशवंत पाचंगे यांचे जागेत असलेला जी. टी. एल. कंपनीचा मोबाईल टॉवर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला १५ लाख रुपयांच्या मोबाईल टॉवरचा भाग चोरी करून नेला होता. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कंपनीचे वतीने फिर्याद दिली होती. तसेच अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेवून कर्नाटक राज्यातून तसेच पुणे जिल्हा परीसरातून एकूण पाच इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले.
तसेच सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालापैकी १३ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरच्या टोळीकडे सखोल चौकशी करता त्यांनी महाष्ट्रातील जी.टी.एल. कंपनीचे सातारा, रत्नागिरी, सांगली, पुणे, बीड, रायगड अशा सहा जिल्हयातील दहा मोबाईल टॉवर चोरी केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, या घटनेत तीन अधिकारी सामील असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने कुंपणानेच शेत खाल्ले असल्याची चर्चा मोबाईल टॉवर जागा मालकांमध्ये आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, राजु मोमीण, मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, चंद्रकांत जाधव, अजित भुजबळ, हनुमंत पासलकर, पहेमंत विरोळे, अक्षय सुपे यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Loni Kalbhor | लोणी काळभोर येथे किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार ; हडपसर येथील एकावर गुन्हा दाखल