Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

न्हावरेतील ‘एमडी’ रॅकेटची पाळेमुळे शिरूर-दौंडसह रांजणगाव एमआयडीसीपर्यंत!

योगेश मारणेby योगेश मारणे
Monday, 31 August 2026, 14:08

न्हावरे : न्हावरे परिसरात एमडी ड्रग्सविरोधात स्थानिक गुन्हे शाखा(एलसीबी), शिरूर आणि न्हावरे पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर या प्रकरणाचे धागेदोरे आता शिरूर, दौंड आणि रांजणगाव गणपती एमआयडीसी परिसरापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. न्हावरेतील तिघांना अटक करण्यात आली असून,पुढील तपासात आणखी ३ ते ४ जण आरोपी म्हणून निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.त्यामुळे एमडी ड्रग्सच्या रॅकेटची साखळी अधिक व्यापक असल्याचे स्पष्ट होत आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,न्हावरे-तळेगाव महामार्गालगत असलेल्या शेळके वस्ती परिसरात बुधवारी(ता.२६) सापळा रचून ही कारवाई करण्यात आली होती. यावेळी संबंधित तिघांकडून सुमारे ५७ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करून त्यांना अटकही केली होती.त्यानंतर पोलिसांनी कोर्टाकडे संबंधित आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पीसीआरची मागणी केली होती.त्यानुसार कोर्टाने पीसीआर मंजूर केला होता. त्यानंतर पोलिसांनी पीसीआरमध्ये संबंधित तिन्ही आरोपींकडून माहिती काढून पुढील तपासाला वेग दिला आहे.

शिरूर-दौंड-रांजणगाव एमआयडीसी कनेक्शन

कारवाईनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता या एमडी ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे शिरूर आणि दौंड तालुक्यासह रांजणगाव गणपती एमआयडीसी परिसराशी जोडले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान आणखी ३ ते ४ जण आरोपी म्हणून निष्पन्न झाल्याने या रॅकेटमागे मोठी साखळी कार्यरत असल्याचा संशय बळावला आहे.

 

रांजणगाव गणपती एमआयडीसी सारख्या औद्योगिक परिसराशी या प्रकरणाचे कनेक्शन समोर आल्याने पोलिस तपासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.एमडीचा पुरवठा नेमका कुठून होत होता, त्याचे वितरण कोणत्या माध्यमातून केले जात होते आणि या साखळीमागे मुख्य सूत्रधार कोण आहे.याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

एमडीची साखळी किती खोलवर?

न्हावरेपासून सुरू झालेला तपास शिरूर-दौंड तालुक्यांसह रांजणगाव गणपती एमआयडीसीपर्यंत पोहोचल्याने एमडी ड्रग्सचा विळखा नेमका किती दूरवर पसरला आहे, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि तरुणांना एमडीचा पुरवठा करणारी साखळी किती मोठी आहे.याचा उलगडा पुढील तपासातून होण्याची शक्यता आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार,या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू असून,पुढील काळात आणखी काही आरोपी आणि महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

‘शॉर्टकट’च्या नादात आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये!

श्रीमंत होण्यासाठी कष्टाला पर्याय नाही.झटपट पैसा मिळविण्याच्या मोहात चुकीचा आणि बेकायदेशीर मार्ग स्वीकारल्यास त्याचा परिणाम केवळ संबंधित व्यक्तीवर होत नाही,तर त्याचे कुटुंब आणि समाजालाही त्याची मोठी किंमत मोजावी लागते.

अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई अडकणे ही समाजासाठी अत्यंत गंभीर बाब आहे.त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या मुलांच्या वर्तणुकीकडे, मित्रपरिवाराकडे आणि दैनंदिन हालचालींकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे.तरुणांनीही शॉर्टकटच्या मोहाला बळी न पडता शिक्षण,व्यवसाय आणि कष्टाच्या मार्गाने आपले भविष्य घडविण्याची गरज आहे.

न्हावरेतील एमडी ड्रग्स कारवाईनंतर उघड होत असलेले शिरूर-दौंड-रांजणगाव एमआयडीसी कनेक्शन पाहता,या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर आहेत,याचा उलगडा पोलिसांच्या पुढील तपासातून होणार आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नूडल्स नव्हे, तर मालमत्तेचा वाद? 5 मृत्यूंच्या प्रकरणात व्हॉइस नोटचा मोठा खुलासा; तिघे ताब्यात

Sunday, 18 October 2026, 13:54

वाघोलीत त्रिंबक कांबळेंना पोलिसांशी अरेरावी भोवली! शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 13:22

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34

इन्स्टावर ओळख, प्रेमविवाह अन् धक्कादायक शेवट!पत्नीचे खासगी व्हिडीओ आई-वडिलांना पाठवले अन्…,पतीच्या कृत्याने खळबळ!

Sunday, 18 October 2026, 12:21

शिरूरमध्ये सराफ दुकानात दोन महिलांकडून हातसफाईचा डाव! सव्वादोन लाखांची सोन्याची चैन लंपास

Sunday, 18 October 2026, 11:57

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू ; हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाच्या सेवारस्त्यावर घटना

Sunday, 18 October 2026, 11:34
Next Post

“आत्याशी बोलत नव्हती म्हणून तुम्हीच आईचा खून केला ना?” मुलाचा सवाल अन् खेड हत्याकांडाचं सत्य आलं समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp