Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नूडल्स नव्हे, तर मालमत्तेचा वाद? 5 मृत्यूंच्या प्रकरणात व्हॉइस नोटचा मोठा खुलासा; तिघे ताब्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 October 2026, 13:54

उत्तरप्रदेश : ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला श्रीपदम गावात महेश, त्यांची पत्नी ललिता आणि त्यांची तीन मुले अशा एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह त्यांच्याच घरात मृतावस्थेत आढळले. या भीषण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.सुरुवातीला आदल्या रात्री चहा आणि नूडल्स खाल्ल्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक चर्चा सुरू होती.मात्र या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक महत्त्वाची व्हॉइस नोट लागली आहे. मृत महेशच्या मोबाईलमधून ही ऑडिओ क्लिप सापडली असून, त्यामध्ये त्याने आपल्या दोन बहिणी आणि एका मेहुण्याला कुटुंबाच्या वाईट परिस्थितीसाठी थेट जबाबदार धरल्याची माहिती समोर आली आहे. या ऑडिओ क्लेमुळे तपासाला एक नवीन वळण मिळाले आहे.

तसेच शवविच्छेदनादरम्यान शरीरात विषबाधेची चिन्हे आढळल्यामुळे डॉक्टरांनी पाचही जणांच्या अंतर्गत अवयवांचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी सुरक्षित ठेवले आहेत. हे अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केवळ खाण्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज बांधणे सध्या घाईचे ठरेल.

तसेच, महेशच्या दुसऱ्या मेहुण्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत संबंधित तिघांवर सतत छळ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र, या संशयितांचा आणि या सामूहिक मृत्यूचा नेमका काय संबंध आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.

 

प्राथमिक तपासात बऱ्याच काळापासून चाललेला मालमत्तेचा वाद आणि तीव्र मानसिक तणाव यांमुळे हे पाऊल उचलले गेल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हा मृत्यू नेमका आत्महत्येमुळे झाला की यामागे दुसरे काही कारण आहे, हे फॉरेन्सिक अहवाल आल्यावरच समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात चक्क बुरखा घालून ज्वेलर्सच्या दुकानात घुसले पुरुष! कोयते-बंदुका काढून थरार अन् शेजारचा दुकानदार ओरडताच….

Sunday, 18 October 2026, 14:42

पुण्यात सख्ख्या भावाचं बहिणीसोबत निर्दयी कृत्य! किरकोळ वाद टोकाला जाताच डोकं सटकलं अन् असं काही केलं की…

Sunday, 18 October 2026, 14:32

नूडल्स नव्हे, तर मालमत्तेचा वाद? 5 मृत्यूंच्या प्रकरणात व्हॉइस नोटचा मोठा खुलासा; तिघे ताब्यात

Sunday, 18 October 2026, 13:54

वाघोलीत त्रिंबक कांबळेंना पोलिसांशी अरेरावी भोवली! शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 13:22

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34

इन्स्टावर ओळख, प्रेमविवाह अन् धक्कादायक शेवट!पत्नीचे खासगी व्हिडीओ आई-वडिलांना पाठवले अन्…,पतीच्या कृत्याने खळबळ!

Sunday, 18 October 2026, 12:21
Next Post

पुण्यात सख्ख्या भावाचं बहिणीसोबत निर्दयी कृत्य! किरकोळ वाद टोकाला जाताच डोकं सटकलं अन् असं काही केलं की...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp