Pune News : पुणे : पोलीस असल्याची खोटी बतावणी करून एका भामट्याने ज्येष्ठाच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना वरवे खुर्द (ता. भोर) येथे नुकतीच उघडकीस आली आहे. दादासाहेब कृष्णाराव शिंदे (वय ६५, रा. मुंबई) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिक नागरिकाचे बनाव आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात एका भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
एका भामट्याने ज्येष्ठाच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादासाहेब शिंदे हे त्यांच्या सासर्याच्या वर्षश्राद्धासाठी वरवे खुर्द (ता. भोर) येथे आले होते. पुणे-सातारा महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने त्यांना थांबवले. मी पोलीस आहे, मी तुम्हाला बराच वेळ आवाज देत होतो, तुम्ही थांबला का नाही? तुमच्या सुरक्षेसाठीच मी थांबलो आहे. या भागात लुटीचे अनेक प्रकार सुरु आहेत. अशी बतावणी करून, खोटे आयकार्ड दाखविले.(Pune News)
दरम्यान, दोघांमधील हा संवाद सुरु असतानाच समोरून दुसरी व्यक्ती आली. त्याच्या गळ्यात सोनसाखळी होती. स्वत:ला पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्याला थांबवले. गळ्यातील सोन्याची साखळी काढ, मी तुला कागदात गुंडाळून परत देतो, असे म्हणाला. संबंधित व्यक्तीने साखळी देण्यास नकार दिला असता, तोतया पोलीसाने त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. तुला कळत नाही का, ती साखळी लगेच काढून दे, असे म्हणत जबरदस्तीने साखळी काढून घेतली.(Pune News)
बाबा तुमची साखळी आणि अंगठी मी कागदात बांधून देतो, असे म्हणत तोतया पोलिसाने ती साखळी अन् अंगठी कागदात बांधली आणि खिशात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकीवर असलेल्या त्या व्यक्तीला दम देत, तुला पोलीस स्थानकात घेऊन जातो, असे सांगत त्याला घेऊन निघून गेला. काही वेळाने शिंदे यांनी कागद उघडून पाहिला असता, कागदात दागिन्यांऐवजी दगड होते.(Pune News)
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तातडीने राजगड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार तोतयाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.(Pune News)