मुंबई : पुण्यामध्ये मानाच्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. तर मुंबईतील लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा उचलत चोरांनी चांगली हातसफाई केली.
राज्यभरात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडली. तब्बल दोन वर्षांनंतर पार पडत असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
लालबागच्या गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी चोरट्यांनी जवळजवळ 50 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि वस्तु चोरले असल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या तक्रारी नोंदवण्यासाठी गणेशभक्तांनी पोलीस स्थानकाबाहेरच रांग लावली होती.
मिरवणुकीवेळी गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे.गेली दहा दिवस लोक दर्शनासाठी रांगा लावत होते, पण आज गणपती बाप्पाला निरोप देतावेळी पोलिस स्थानकाबाहेर रांगेत उभे वेळ गणेश भक्तांवर आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरीला गेलेल्या वस्तूंची तक्रार करण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यामध्ये गणेशभक्तांनी गर्दी केली.
तक्रार नोंदवून घेण्यासाठी भक्तांनी पोलीस स्थानका बाहेर रांगच लावली होती. मोबाईल चोरी आणि दागिन्यांच्या चोरीचे अनेक गुन्हे नोंदवून घेताना पोलिसांचीही दमछाक झाली