Pune News : पुणे : बेकायदा सावकारीच्या त्रासाला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना किरकिटवाडी भागात घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जंगम यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. (Pune News)
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
नीलेश जंगम (रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुहास दांडेकर, गोविंद मारुती भोपळे, वर्षा गोविंद भोपळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत नीलेश जंगम यांच्या पत्नीने हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगम यांचे मित्र गोविंद भोपळे याने एकत्रित व्यवसाय सुरू करू, असे जंगम यांना सांगितले होते. भोपळे याने जंगम यांच्या नावाने बेकायदा सावकारी करणारा आरोपी दांडेकर याच्याकडून साडेतीन लाख रुपये व्याजाने घेतले होते. भोपळे याने व्यवसाय सुरू न करता व्याजाने घेतलेले पैसे खर्च केले. (Pune News)
दरम्यान, जंगम यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा भोपळे आणि त्याची पत्नीने टाळाटाळ केली. दांडेकर याने व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. पतीला शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली. दांडेकरच्या त्रासामुळे पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे जंगम यांच्या पत्नीने हवेली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक शीतल ठेंबे तपास करीत आहेत. (Pune News)