Pune News : पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द भागात एका सोसायटीत वाहने पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली. वडगाव खुर्द भागातील मियामी सोसायटीत मध्यरात्री शिरलेल्या अज्ञातांनी दुचाकी आणि मोटारीवर ज्वलनशील पदार्थ ओतला. दुचाकी आणि मोटारी पेटवून आरोपी पसार झाले.
मित्रांसोबत भांडण झाल्याने त्याच्यावरचा राग काढण्यासाठी गाडी पेटवायला गेला आणि भलत्याच गाड्या पेटवून त्या भस्मसात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एक चारचाकी आणि अन्य दुचाकी वाहनांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. वडगाव-खुर्द येथील लगडमळ्यात असलेल्या मियामी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. (Pune: What is this! Out of anger, he went to set his friend’s car on fire and the entire parking lot was set on fire)
याबाबत महेंद्र प्रदीप भिरुड (वय ४०, रा. सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेची माहिती रहिवाशांनी पोलीस, तसेच अग्निशमन दलाला दिली. (Pune News) अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासत पोलिसांनी गाड्या पेटवणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव खुर्द भागातील मियामी सोसायटीमधील ए-२ या इमारतीमधील लिफ्ट जवळ सोसायटीचे सार्वजनिक पार्किंग आहे. त्याठिकाणी रात्री येथील सर्व गाड्या उभ्या केलेल्या असतात. याच सोसायटीमधील एका मुलाचे आणि गाड्या पेटवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. भांडणाचा राग आल्याने मित्राचा बदला घेऊन धडा शिकवण्यासाठी त्याने मित्राच्या गाडीला आग लावण्याचे ठरवले.(Pune News) मित्राची गाडी रात्रीच्या वेळी कोणत्या ठिकाणी लावली जाते याची त्याने पाहणी केली. त्यावेळी त्याला तेथील पार्किंगमध्ये गाडी लावल्याचे समजले. गुरुवार, ८ जून रोजी पहाटे १ वाजून २८ मिनिटांनी तो सोसायटीमध्ये आला. येताना सोबत त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून ज्वलनशील पदार्थ आणला होता. ते पदार्थ वाहनांवर टाकून काडीपेटीने आग लावली. गाड्यांना आग लावून तो पसार झाला.
चार वाहने जळून खाक
या आगीत वाहने जळून खाक झाली आहेत. त्यामध्ये २ मोपेड दुचाकी, एक एन्फिल्ड बुलेट आणि एक चारचाकी ही वाहने होती. (Pune News) सोसायटीमधील महेंद्र भिरुड यांनी हा प्रकार कोणी केला हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यांना एक अनोळखी मुलगा आढळला. या आगीत एकूण २ लाख ५० हजारांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पत्नीची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे केली सोशल मीडियावर व्हायरल
Pune News : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून सासवड -जेजुरी पालखी मार्गाची पाहणी